टिपू सुलतान: मैसुरचा तो वाघ ज्याची रॉकेटची टेक्नीक इंग्रजांनी इंग्लंडला चोरून नेली होती

0

म्हैसूरचा शासक टीपू सुलतान याला शक्तिशाली योद्धा म्हणून पुर्ण जग ओळखते. टीपू सुलतानने ब्रिटीशांना कठोर धडा शिकविला होता, जे भारताचा ताबा घेण्याच्या उद्देशाने भारतात आले होते आणि योजना बनवत होते. टीपू सुलतान यांच्या युद्धाच्या धोरणामुळे आणि तंत्रज्ञानाने युक्त शस्त्रामुळे इंग्रजांना बर्‍याच वेळा पराभवाला सामोरे जावे लागले.

असे म्हटले जाते की, इंग्रजांनी टीपू सुलतानचे रॉकेट तंत्रज्ञान चोरुन नेले. म्हैसूर साम्राज्याचा अधिपती हैदर अली याने आपला मुलगा शहजादा टीपू सुलतान याला युद्धाचे प्रशिक्षण देऊन वाढवले होते. टीपूने लहानपणी गोळा फेकणे, भाला फेकणे आणि कुस्तीचे प्रशिक्षण घेतले.

हैदर अलीने तारुण्यातच मुलाला तोफखान्याची जबाबदारी दिली आणि त्याला दारूगोळा आणि तोफखाना चालवायला शिकवले. परिणामी, टीपू सुलतान आपल्या तारुण्यात एक शक्तिशाली सैनिक म्हणून उदयास आला. २० नोव्हेंबर १७५० रोजी जन्मलेल्या टीपू सुलतानला हैदर अलीच्या आकस्मिक निधनानंतर म्हैसूरची गादी देण्यात आली.

सिंहासनावर बसून टीपूला प्रथम ब्रिटिशांनी आव्हान दिले होते. इंग्रजांचा हेतू लक्षात घेऊन टीपूने आपली लष्करी शक्ती वाढवण्याची योजना आखली. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी टिपूने मजबूत आणि पूर्णपणे लोखंडी तोफ बांधली आणि तोफखान्यातील लोकांची संख्याही वाढवली. यामुळे गोळीबार करण्यात जाणारा वेळ कमी झाला.

याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सैनिक जेव्हा पहिल्या स्फोटाला सामोरे जायचे किंवा त्यातून सावरायचे त्याच्या आधीच दुसरा गोळा त्यांच्यावर पडत असे त्यामुळे त्यांना काय करावे हे सुचतच नव्हते. तज्ञांच्या मते टीपू सुलतानाच्या या आधुनिक तंत्राने बनवलेल्या बंदुका आणि डावपेचांनी ब्रिटीशांना प्रचंड भीती वाटायची.

यातून धडे घेत पुढच्या वेळी इंग्रज काळजीपूर्वक आले. यापूर्वी टीपूने रॉकेट्ससारख्या बांबूच्या खांबावर दारूगोळा आणि शेल वापरण्याची रणनीती आखली होती. त्याचा फायदा म्हणजे जड तोफ खेचण्यात आणि त्यांचा गोळा वाहून नेण्यास जास्त त्रास झाला नाही. बांबूच्या रॉकेटमध्ये सुमारे 250 ग्रॅम गनपाऊडरचे गोळे होते.

हे रॉकेट २०० मीटरपेक्षा जास्त उंच जायचे. टिपूच्या या तंत्राने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, टीपू सुलतानला १७९९ मध्ये ब्रिटीशांनी त्याला फसवले आणि ठार केले. टीपूला ठार मारण्यासाठी ब्रिटीशांनी त्याची किंमती तलवार हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना यश आले नाही.

टिपूच्या तलवारीच्या मुट्ठीवर एक सिंह होता, ज्याचे डोळे मौल्यवान मण्यांनी बनविलेले होते. मृत्यूनंतरही टीपू सुलतानाच्या हातातून तलवार काढण्यासाठी इंग्रजांना संघर्ष करावा लागला. टीपू सुलतानच्या मृत्यूनंतर ब्रिटीशांनी त्याचे रॉकेट तंत्रज्ञान चोरून नेले. टीपूची युद्धाची रणनीती समजून घेण्यासाठी ब्रिटीशांनी त्याच्या तोफा आणि तोफखाना ताब्यात घेतला.

असे म्हटले जाते की इंग्रजांनी टिपू सुलतानची तलवार आणि तोफ व रॉकेट, तलवार इ. वस्तू इंग्लडंला नेल्या होत्या. इंग्लंडमध्ये टीपू सुलतानचे शस्त्रास्त्रांचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी इंग्रजांनी संशोधन केले होते. त्यानंतर त्याचे तंत्रज्ञान वापरून इंग्रजांनी अनेक शस्त्रे बनवली होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.