प्रसुतीवेळी बहिणीला रूग्णवाहिका भेटली नाही, आता तो गर्भवती महिलांना देतो २४ तास मोफत सेवा

0

आज आम्ही तुम्हाला अशा ऑटो ड्रायव्हरबद्दल सांगणार आहोत ज्याच्या माणुसकीसाठी लोक त्याला ओळखतात. त्याचे कार्य जर तुम्ही वाचले तर तुम्हीही त्याला सलाम ठोकाल. बंगळुरूचा या ऑटोड्रायव्हर गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये फुकट सेवा देतो आणि ही सेवा २४ तास चालू असते.

त्याचे नाव मल्लिकार्जुन आहे. मागील पाच वर्षांपासून ते हे मोलाचे काम करत आहेत. आपातकालिन स्थितीमध्ये ते महिलांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचवतात. त्यांच्यामुळे अनेक महिलांना लाभ झाला आहे.

त्यांचे म्हणणे आहे की त्यांना हे काम करण्यात आनंद मिळतो आणि जर प्रसुतीला जर एखाद्या महिलेला उशीर झाला तर तिचा मृत्युही होऊ शकतो. त्यामुळे त्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे असते.

महिलांना २४ तास आपातकालीन सुविधा देण्यासाठी त्यांनी आपल्या रिक्षावर एक संदेश लिहीला आहे. मल्लिकार्जुन यांची ही माणुसकी पुर्ण परिसरात फेमस आहे. त्यांच्या या कामामुळे त्यांना अनेक लोक ओळखतात.

त्यांची हीच आशा असते की लवकरात लवकर गर्भवती महिलेला प्रसुतीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये नेले पाहिजे जेनेकरून तिला होणारा त्रास हा जास्तवेळ तिला सहन करावा नाही लागणार. मल्लिकार्जुन गर्भवती महिलेला रिक्षामध्ये कोणताही त्रास होऊ नये याची पुर्ण काळजी घेतात.

मल्लिकार्जुन हे काम मागील पाच वर्षांपासून विनामुल्य करत आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० महिलांना याद्वारे मदत केली आहे. गर्भवती महिलांना मदत केल्यानंतर ते खुप समाधानी असतात. ज्या गर्भवती महिलेला मदत हवी आहे ते दिवस दिवस रात्र बघत नाहीत.

कसलीही परवा न करता मल्लिकार्जुन मदतीसाठी त्या ठिकाणी हजर असतात. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांनी ही सेवा तेव्हा सुरू केली जेव्हा त्यांची बहिण गर्भवती होती आणि तिला प्रसुतीच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये नेण्यास खुप त्रास झाला होता.

तेव्हा रूग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे हा त्रास दुसऱ्या कोणत्या महिलेला होऊ नये म्हणून त्यांनी ही सेवा त्यांच्या परिसरात सुरू केली. त्यांनी रिक्षाच्या मागे त्यांचा मोबाईल नंबर लिहीला जेनेकरून जेव्हा गरज पडेल तेव्हा लोक त्यांना फोन करू शकतील.

Leave A Reply

Your email address will not be published.