कधी बाप, कधी भाऊ तर कधी मुलगा बनून ते बेवारस मृतदेहाला देतात मुखाग्नी

0

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने आजपर्यंत १ लाखांपेक्षा जास्त बेवारस मृतदेहांना अग्नी दिला आहे. कोरोनाकाळातही त्यांनी ही सेवा चालूच ठेवली. त्यांनी या काळात ५०० कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अत्यंसंस्कार केले आहेत.

शवगृहातून बेवारस मृतदेह ताब्यात घ्यायचा. कुजलेले, वेगळे झालेले शरीराचे भाग शवाहिनीत ठेऊन स्मशानात जायचे. कधी मुलगा, कधी बाप, कधी भाऊ बनून मृतदेहाला अग्नी द्यायचा. हा त्यांचा रोजचा दिनक्रम आहे.

त्यांचे नाव आहे अंमलदार ज्ञानदेव वारे. त्यांचे वय आहे ५२ वर्षे. ते २० वर्षे झाली ही सेवा करत आहेत. ताडदेव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे ज्ञानदेव वारे हे १९९५ मध्ये मुंबई पोलिस दलात रूजू झाले होते.

ते चेंबूरमध्ये पत्नी, मुलगी, मुलासोबत राहतात. सुरूवातीला ६ वर्षे त्यांनी पोलिस ठाण्यात काम केले. २००० मध्ये त्यांना शववाहिनीवर चालक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांनी ही जबाबदारी स्विकारली.

त्यांनी त्यांचा अनुभव सांगताना सांगितले की, सुरूवातील हात थरथर कापले, भीतीही वाटली होती. नकळत मी रडलो. ताप यायचा. झोपही उडाली होती. भूकही लागत नसे. रात्री अपरात्री स्वप्नात मृतदेहच दिसत होते.

त्यावेळी मनात विचार आला की थांबावे की पुढे जावे. हीसुद्धा एक सेवाच असा समज मनाला दिला आणि काम चालूच ठेवले. कुठल्याही एका अनोळखी व्यक्तीला जेव्हा आपण त्याचे नातेवाईक बनून मुखाग्नी देतो त्याचे मोल कोणीही समजू शकत नाही.

यातून खुप मोठे समाधान मिळते. कोरोनाच्या काळात जेव्हा रक्ताचे नातेवाईक जवळ येत नव्हते तेव्हा त्यांनी केवळ तोंडाला मास्क लावून आणि हातात ग्लोज घालून ५०० कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले.

मग तो मुसलमान असो वा हिदुं त्यांनी सर्वांना आपले मानून अंत्यसंस्कार केले. बुधवारीही त्यांनी ८ मृतदेहांना अग्नी दिल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या कार्याला एक सलाम तर बनतोच.

Leave A Reply

Your email address will not be published.