कचरा विकून हा पठ्ठ्या कमवतोय महिल्याला १५ लाख रुपये; वाचा कसं…

0

या जगात कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते, माणसाची जिद्द असेल तर तो छोट्या कामाला मोठ्या व्यवसायात बदलू शकतो. याचे उत्तम उदाहरण आहे जयप्रकाश चौधरी. ज्यांनी आपल्या छोट्या कामाचे रूपांतर एका मोठ्या व्यवसायात केले आहे.

जयप्रकाश चौधरी कचरा विकून आज महिन्याला १५ लाखांपेक्षा जास्त रुपये कमवत आहे. तसेच ‘सफाई सेना’ नावाची संस्था बनवत त्यांनी दिल्लीतल्या ४ हजार कुटुंबांना रोजगार दिला आहे.

१८ मार्च १९७६ मध्ये बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात जयप्रकाश यांचा जन्म झाला होता. जयप्रकाश आपल्या नऊ भाऊ बहिणींमध्ये सर्वात मोठे होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे शाळेचे शिक्षण त्यांनी गावातल्या सरकारी शाळेतच केले.

शिक्षण घेण्यात त्यांचे मन लागत नव्हते, त्यामुळे त्यांनी १० वी पर्यंतचे शिक्षण घेऊन १७ वर्षाचे असतानाच आपले गाव सोडले आणि ते दिल्लीला आले. तेव्हा त्यांचे एकच ध्येय होते, ते म्हणजे आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलवणे यासाठी त्यांना पैसा कमवायचा होता.

एका नव्या माणसाला शहरात आल्यावर ज्या संकटांचा सामना करावा लागतो, त्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. सुरुवातीला जयप्रकाश एका कपड्याच्या दुकानात काम करत होते, मात्र काही कारणांमुळे त्यांना हे काम सोडावे लागले.

पैसे संपले होते, त्यामुळे ते काही दिवस मंदिरात राहिले, तर काही दिवस फूटपाथवर. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी कचरा गोळा करण्याचे काम सुरू केले. सन १९९५  त्यांनी सुरुवातीला एक ७५० रुपयांची सायकल खरेदी केली.

त्या सायकवर ते दारोदारी हिंडायचे आणि लोकांच्या घरून वह्या, पुस्तकं, वर्तमानपत्र गोळा करून आणायचे. या कामात त्यांना चांगला फायदा होत होता. कामाचे त्यांना दिवसाला १५० रुपये मिळत होते. त्यामुळे त्यांच्या डोक्यात स्वतःचा भंगारचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आला.

१९९६ मध्ये त्यांनी दिल्लीच्या झुग्गु बाजारात रोडला लागून असलेले एक गोदाम भाड्यावर घेतले. या कामासाठी त्यांनी १० कचरा गोळा करणाऱ्या लोकांची मदत घेतली आणि हा व्यवसाय सुरू केला.

सुरुवातीला जयप्रकाश यांना अडचणी आल्या पण नंतर त्यांचा या व्यवसायात जोर बसायला लागला. त्यांनी लवकरच एक मशीन घेतली. त्या मशीनमुळे कचरा लगेच रिसायकल करण्यात मदत होत होती.

कचऱ्याला ताबडतोक रिसायकल केल्याजाणाऱ्या या मशिनमुळे अनेक लोक जयप्रकाश यांच्याशी संपर्क साधत गेले. २००९ मध्ये त्यांनी जे. पी. इंजिनिअर नावाने आपली कंपनी रजिस्टर केली.

आज १२ हजारांपेक्षा जास्त स्क्रॅपचा व्यवसाय करणारे लोक,कचरा जमा करणारे कामगार, सफाई कर्मचारी आणि कचरा रिसायकल करणाऱ्या कंपन्यांसोबत जयप्रकाश काम करत आहे. जयप्रकाश हे फक्त काम करून पैसाच कमवत नाहीये, तर कचऱ्याला रिसायकल करून पर्यावरणालाही सुरक्षित ठेवत आहे.

आज जयप्रकाश या व्यवसायातून महिन्याला १५ लाखांपेक्षा जास्त पैसे कमवत आहे. तसेच त्यांनी ४ हजार कुटुंबांना रोजगार दिला. जयप्रकाश चौधरी यांची ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.