हवा फक्त दाजींचीच! ३०० खिळे, ५० घुंगरू असलेली १५ किलोची कोल्हापुरी वापरणारे दाजी देशभर फेमस

0

प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा नाद असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याला कोल्हापुरी चपलांचा नाद आहे. आणि ह्या चपला साध्यासुध्या चपला नाहीयेत. या चपलांवर खास प्रकारची कलाकारी करण्यात आली आहे.

सोलापूरचे रहिवासी असलेल्या या आजोबांची चर्चा पुर्ण देशात रंगली आहे. दाजी दोलतडे असे त्या आजोबांचे नाव आहे. त्यांचे वय ७५ वर्षे आहे. ते अगदी लहानपणापासूनच वेगवेगळ्या बांधणीच्या चपला वापरतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अगदी या वयातही ते तब्बल १५ किलोच्या कोल्हापुरी चपला वापरतात.

माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी हे गाव दुष्काळग्रस्त गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथीलच रहिवासी आहेत दाजी दोलताडे. त्यांना पहिल्यापासूनच कोल्हापुरी पद्धतीच्या चपला वापरण्याचा छंद आहे. पुढे त्यांचा हा छंद अधिकच वाढत गेला.

दाजी दोलतडे यांनी शोले चित्रपट पाहिला आणि त्यांनी त्यातील गब्बरसिंगची बुटे पाहिली. त्याची वजनदार बुटे पाहून आपणही वजनदार चपला वापराव्या अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरी पद्धतीच्या पाच किलो वजनाच्या चपला तयार करून घेतल्या.

यानंतर त्यांनी आपल्या चपलांचे वजन आजून वाढवले आणि आता त्यांच्या चपलांचे वजन १५ किलो आहे. त्यांना या पद्धतीच्या कोल्हापुरी चपलीचा एक जोड बनविण्यासाठी तब्बल २५ हजार रुपये खर्च आला.

आता तुम्ही म्हणाल असे काय खास आहे या चपलांमध्ये? तर या चपलांवर ५० घुंगरे आहेत, लाईटींग आहे, नक्षीकाम आहे, ४०० रिबिटचे गुंफण, चपलांना मजबुत ठेवण्यासाठी ३०० खिळे लावण्यात आले आहेत.

तसेच १२ तळी कातडे, ४ नट बोल्ट ह्या सर्व वस्तु मिळवून या चपलांची बांधणी करण्यात आली आहे. याच चपाल घालून ते कर्र..कर्र आवाज करत पुर्ण गावभर हिंडत असतात. त्यामुळे ही आता त्यांची ओळख बनलेली आहे.

आज त्यांचे वय ७५ वर्षे जरी असले तरी त्यांच्या पायात १५ किलो वजनाच्या चपला आहेत. केवळ छंद म्हणून त्यांनी या चपला बनवून घेतल्या आहेत आणि आता ते पुर्ण देशभर फेमस झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.