तो काहीच काम करत नाहीत तरी कमवतो बक्कळ पैसा, सगळ्यांना वाटतो तो हवाहवासा

0

अनेक मुलांना त्यांचे आई वडिल टोमणे मारत असतात की तु काहीच करत नाहीस. तुला काहीच वाटत नाही का? काही जणांचे आयुष्यात काहीतरी करायचे गोल असतात. त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असतं. आणि काहीजण असे असतात त्यांना काहीच जमत नाही.

त्यांना लोक प्रश्न विचारतात की तुला काहीच जमत नाही कसं होणार तुझं. प्रत्येकाला पोट भरण्यासाठी, घर चालविण्यासाठी काहीतरी करावं लागतं. पण तुम्ही कधी असं ऐकले आहे का की कोणीतरी व्यक्ती काहीच काम न करता दररोज हजारो रूपये कमवत आहे आणि हो त्याच्या सेवेलाही भरपूर मागणी आहे.

तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. जपानमध्ये राहणारे शोजी मोरिमोटो यांचे वय ३७ वर्षे आहे. शोजी काहीच न करण्याचे १० हजार येन आकारतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण शोजी यांचे हजारो ग्राहक आहेत.

सोशल मिडीयावर त्यांच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. टोकियोमध्ये राहणारा कोणताही व्यक्ती शोजी यांची सेवा घेऊ शकतो. शोजी सेवा देताना त्या व्यक्तीसोबत राहतात, खातात, पितात आणि त्यांचे बोलणे ऐकूण घेतात व त्यांना प्रतिसाद देतात.

शीजो यांनी २०१८ ला काहीच न करण्याची सेवा सुरू केली आहे. त्यांनी एकदा ट्वीट केले होते की मी स्वताला भाड्याने उपलब्ध करून देत आहे. मी काहीच करत नाही. तुम्हाला दुकानात एकटं जाण्याचा कंटाळा येतो का?

तुमच्या टीममध्ये एक खेळाडू कमी आहे का? मी ती कमी पुरी करू शकतो. या गोष्टींशिवाय मी काहीच करू शकत नाही. असं ट्वीट त्यांनी २ वर्षांपुर्वी केलं होतं. सुरूवातीला त्यांनी ही सेवा फुकट द्यायला सुरूवात केली होती पण नंतर त्यांच्या ट्वीटला खुप लोकांनी प्रतिसाद दिला.

मग त्यांनी शुल्क आकारण्यास सुरूवात केली. सध्या ते रोज तीन ते चार ग्राहकांना ही सेवा देत आहेत. आतापर्यंत त्यांनी ३ हजार लोकांना ही सेवा दिली आहे. ग्राहक विविध कारणांसाठी शोजी यांची सेवा घेत असतात.

जसे की कोणाला कामाचा ताण आला शोजी त्यांच्या समस्या ऐकून घेतात, कोणाला एकांतवासाचा कंटाळा आला की शोजी यांची सेवा लोक घेतात, काहींना वाटतं की आपलं कोणीतरी ऐकावं. असे व्यक्ती शोजी यांना फोन करतात. शोजी म्हणाले की, मी कोणाचाही मित्र किंवा नातेवाईक नाही.

नात्यांमुळे ताणतणाव माझ्या आयुष्यात नाहीत. पण अशा प्रकारचे ताण, समस्या इतरांच्या आयुष्यात आहेत. त्यांना वाटते कोणीतरी या समस्या ऐकून घ्याव्यात. त्यामुळे लोकांचे मन हलके होते. आपलं कोणीतरी ऐकून घेतंय ही भावना महत्वाची असते, असं शोजी म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.