१४ वर्षांच्या वयात या भारतीय व्यक्तीने ईमेलचा शोध लावला होता जे आज पुर्ण जग वापरत आहे

0

आजचे जग खुप पुढे गेले आहे. इंटरनेटशिवाय तर माणूस जगूच शकत नाही. इंटरनेट हे आपल्या जीवनाचा खुप अविभाज्य घटक बनला आहे. त्यातल्या त्यात असे अनेक माहिती पुरवण्याचे साधने आहेत त्याचाही वापर आपण दैनदिंन जीवनात करतो. त्यातीलच एक सर्वात महत्वाचे साधन आहे ईमेल.

अनेक लोक आज ईमेल वापरतात. आज आपल्याला जगात असा एकही व्यक्ती सापडणार नाही की त्याचा स्वताचा ईमेल नसेल. जर काही अक्षिशीत लोक सोडले तर तुम्हाला सगळ्यांचे ईमेल सापडतील. कारण ईमेलशिवाय कोणतेही पर्सनल किंवा आपल्या कामाच्या किंवा कंपनीच्या संबधित असलेला संदेश आपण पाठवू शकत नाही.

पण बऱ्याच लोकांना माहीत नाही की ईमेलचा शोध एका भारतीय व्यक्तीने लावला होता. अनेकांना फक्त एवढेच माहीत आहे की ईमेल ही सर्व्हिस गुगल पुरवते पण त्याचा शोध कोणी लावला हे कोणालाच माहीत नव्हते. आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने ईमेलचा शोध लावला. विशेष म्हणजे तो व्यक्ती भारतीय आहे.

जेव्हा ईमेलचा शोध लागला तेव्हा माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात या शोधाला खुप महत्वपुर्ण मानले गेले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की संदेश पोहोचवण्याचे काम करणाऱ्या सर्वात विश्वासू ईमेल या माध्यमाचा शोध भारताच्या व्ही.ए. शिवा अय्यादुराई यांनी लावला होता.

वयाच्या १४ व्या वर्षी, व्हीए शिवा अयादुराई यांनी १९७८ साली संगणक प्रोग्राम तयार केला होता. या कॉम्प्युटर प्रोग्रामला ‘ईमेल’ हे नाव देण्यात आले होते. त्यामध्ये इनबॉक्स, आउटबॉक्स, फोल्डर्स, मेमो, अटॅचमेंट्स इ. अनेक ऑप्शन्स होते. हे सर्व आजही ई-मेल सिस्टीमचा एक भाग आहे हे सर्वांनाच माहीत आहे.

३० ऑगस्ट १९८२ रोजी, अमेरिकन सरकारने अय्यादुराईला या मोठ्या कामगिरीसाठी ईमेल शोधकर्ता म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली होती. दरम्यान, अय्यादुराई यांनी १९७८ मध्येच ईमेलचा शोध लावला होता आणि त्यानंतर या शोधासाठी प्रथम अमेरिकन कॉपीराइट मंजूर झाला. हा तो काळ होता जेव्हा कॉपीराइट हे एकच असे सॉफ्टवेअर होते ज्याने शोध सुरक्षित ठेवले जाऊ शकत होते.

अय्यादुराई यांनी त्यांच्या कामामुळे १९८१ मध्ये वेस्टिनहाऊस सायन्स टॅलेंट सर्च अवॉर्ड जिंकला होता. अय्यादुराई यांनी ईमेल आणि कॉपीराइटचा शोध लावला तेव्हा संगणक तंत्रज्ञानाच्या इतिहासात अनेक वाद सुरू झाले होते. कारण इतरांनीही ईमेलचा शोध लागला असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली होती.

व्ही.ए. शिवा अय्यादुराई यांचा जन्म मुंबईतील एका तामिळ कुटुंबात झाला होता. अय्यादुराई वयाच्या सातव्या वर्षी आपल्या कुटूंबासह अमेरिकेत गेले. वयाच्या १४ व्या वर्षी, अय्यादुराई यांनी संगणक प्रोग्रामिंगचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या कॉरंट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्स येथे खास समर कार्यक्रमात भाग घेतला.

अय्यादुराई नंतर बॅचलर पदवीसाठी न्यू जर्सी येथील लिव्हिंग्स्टन हायस्कूलमध्ये गेले. तेथे अभ्यास करण्याव्यतिरिक्त, त्यांनी न्यू जर्सीच्या मेडिसिन अँड डेन्टिस्ट्री विद्यापीठात रिसर्च फेलो म्हणूनही काम केले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.