अभिमानास्पद! अमेरिकेच्या यशात भारताच्या महिलेचे मोठे योगदान, नासाचा रोव्हर मंगळावर उतरवला

0

अमेरिकेने अंतराळात त्यांचे पर्सिव्हियरन्स रोव्हर हे यान मंगळावर उतरवलं. मंगळावर जीवनसृष्टी अस्तित्वात होती का नाही याचा शोध घेण्यासाठी हा रोव्हर मंगळावर पाठविण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे मंगळावर असलेल्या दुर्गम भागात म्हणजे जेजेरो क्रेटर भागात यान उतरवलं आहे. नासाने सांगितले की पुढील काही महिने रोव्हर मंगळावरच राहिल. या कालावधीत तो मंगळावरील जीवनसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेईल. त्यानंतर काही नमुने गोळा करण्यात येतील.

याचा भविष्यात माणसाला मंगळावर जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. यावेळी अमेरीकेला मंगळावर रोव्हर उतरवण्यात यश आल्यानंतर यामध्ये भारतीय वंशाची वैज्ञानिक डॉक्टर स्वाती मोहन यांची भूमिका महत्वाची ठरली.

त्यांनी रोव्हरच्या नियंत्रण आणि लॅंडिंग सिस्टीमचं नेतृत्व केलं होतं. यात सर्वात कठीण असं टचडाऊन नेव्हिगेशन करण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी याआधी बऱ्याच अंतराळ मोहीमेत महत्वाचा वाटा उचलला आहे.

स्वाती सुरूवातीला नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत सुरूवातीला मंगळ रोव्हर मिशनच्या सदस्या होत्या. नासाच्या इतर मोहिमांमध्येही त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी शनि ग्रहावरचं कॅसिनी आणि चंद्रावरील गेल मोहिमेसाठीसुद्धा काम केले आहे. त्यांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा चित्रपट पाहिल्यानंतर झाली.

त्या चित्रपटाचे नाव होते स्टार ट्रेक. जगातले वेगवेगळे भुभाग, ठिकाणे शोधायची आहेत असं त्यांनी ठरवलं. त्यांना फिजिक्स खुप आवडत असे. फिजिक्सचा तास आणि शिक्षिका यामुळे अंतराळ संशोधनाची त्यांना आवड निर्माण झाली.

नासाच्या रोव्हरचे लॅंडिंग होण्याच्या आधीची सात मिनिटे खुप महत्वाची होती. यावेळी सर्वांनी श्वास रोखून धरले होते. रोव्हरच्या लॅंडिंगचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. स्वाती यांनी शांतपणे आणि संयमाने काम केलं.

त्यांनी आपल्या साथिदारांसोबत योग्य तो संवाद साधला आणि जबाबदारी पार पाडली. सध्या पुर्ण भारतात त्यांचे कौतुक केले जात आहे. अमेरीकेतही त्यांच्या या कार्याचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.