वडिलांच्या निधनानंतर इतक्या कमी वयात संभाळतेय कुटुंबाला की तुम्हीही व्हाल हैराण; वाचा संघर्षाची गोष्ट

0

 

पुरुष नेहमीच संसाराचा गाडा ओढण्यासाठी, आपले कुटुंब सांभाळण्यासाठी प्रयत्नशील असतो. पण जर कर्त्या पुरुषाचे अचानक निधन झाले तर कुटुंबाला ज्या परिस्थितीलासामोरे जावे लागते, त्याचा विचार करणेही आपल्याला जड जाईल.

आज आपण एका अशा मुलीची गोष्ट पाहणार आहोत जिने वडिलांच्या निधनानंतर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. आपले कुटुंबाला सांभाळण्यासाठी तिने चारचाकी मालवाहतूक गाडी चालवण्यास सुरुवात केली.

या मुलीचे नाव तेजस्विनी राऊत आहे. तेजस्विनी आपल्या कुटुंबासोबत वर्धा जिल्ह्याच्या आंजीमध्ये राहते. अचानक वडिलांचे निधन झाले, त्यामुळे घरात कोणी पुरुष नाही. अशात तिनेच कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे.

तेजस्विनीचे वडील म्हणजेच महेंद्र राऊत यांचे एका आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर उपाचार सुरू होते, पण अचानक त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुली होत्या.

घरात कर्ता पुरुष नसल्याने त्यांचे जीवन जगणे कठीण झाले होते. त्यात सर्वात मोठी तेजस्विनी, दुसरी मयुरी आणि तिसरी श्रेया अशा या तीन मुलींची नावे होती.

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते, म्हणून थोरली मुलगी तेजस्विनीने कंबर कसली आणि कामाला लागली. तिने आपल्या वडिलांच्याच व्यवस्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

तिच्या वडिलांची तीन एकर शेती होती. पण ती देखील मदन उन्नई कालव्यात गेली. थोडाफार पैसा मिळाला होता. त्यामुळे त्यांनी एल चारचाकी मालवाहतूक गाडी घेतली होती. आता तिने तेच मालवाहतूक वाहन चालवण्यास सुरुवात केली आहे.

तिने ड्रायव्हिंग क्लास लावून परवाना मिळवला आहे. आता ती ते वाहन चालवून मिळालेल्या पैशातून आपले कुटुंब चालवत आहे. तसेच तिचे आणि बहिणींचे शिक्षणही पूर्ण करत आहे. तिचे बीएससीचे शिक्षण झाले असून ती पुढेही शिक्षण घेत आहे.

लहान बहिणींच्या शिक्षणात कुठलीही अडचण येऊ देणार नसल्याचे तिने म्हटले आहे. इतक्या कमी वयात घर सांभाळण्याची जबाबदारी घेतल्याने आता तेजस्विनी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.