शिक्षक असावा तर असा! कधी रेल्वेत न बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी काढली विमान ट्रिप

0

 

 

असे म्हणतात आपल्या आई वडीलांनंतर अशी एकच व्यक्ती असते, जिला आपलं भविष्य उज्वल व्हावं असं वाटंत, ती व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक. आपण अनेकदा शिक्षकांना विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी विविध प्रयोग करताना बघत असतो.

आजच्या शिक्षकाची गोष्ट ही अशीच काहीशी आहे, या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कधी मनात देखील आले नसेल असे स्वप्न पुर्ण केले आहे. मध्य प्रदेशच्या एका शिक्षकाने आपल्या खिशातल्या पैशांनी विद्यार्थ्यांना विमान प्रवास करुन दिला आहे.

गावातल्या सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानाने प्रवास करणे एका स्वप्नासारखेच आहे. लवकर रेल्वेत बसणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना किशोर कनासे या शिक्षकाने आपल्याकडे असलेल्या पैशातून विमान प्रवासाचा अनुभव करुन दिला आहे.

मध्य प्रदेशच्या देवासमधल्या आगरोद संकूल इथल्या ग्राम बिजेपुर शाळेत किशोर कनासे शिकवतात. किशोर कनासे यांनी आपल्या खर्चातून १८ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विमानाची ट्रिप करुन दिली आहे.

सरकारी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दल आपण नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो. त्यात अनेकदा आपण विद्यार्थ्यांसोबत चुकीची वर्तवणूक करताना, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना निष्काळजीपणा करताना बघत असतो.

पण शिक्षक किशोर हे त्या सर्व शिक्षकांपेक्षा अपवाद आहे. किशोर हे नेहमीच विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक वेगळे वातवरण निर्माण करुन देत असतात. तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती व्हावी यासाठी ते नेहमीच विद्यार्थ्यांसाठी ट्रिप काढत असतात.

किशोर यांनी विद्यार्थ्यांना दिल्लीतील लालकिल्ला, संसद भवन, राष्ट्रपती भवन, कुतुबमिनार, अक्षरधाम मंदिर आणि कनॉट प्लेससारख्या ठिकाणी फिरवून आणले आहे.

किशोर नेहमीच विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात. जेव्हा पण मुलांना वही, पुस्तक, पेन्सिल तसेच कुठलीही मदत लागली तर ते करत असतात. तसेच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी ते वर्षातून एकदा शाळेत खेळाच्या स्पर्धाही आयोजन करत असतात.

आजकाल सरकारी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. सरकारी शाळेत शिकवणाऱ्या अनेक निष्काळजी शिक्षकांच्या गोष्टी समोर येत असतात, पण अशात विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपड करणारे किशोर कनासे आदर्श शिक्षकाचे एक उत्तम उदाहरण बनले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.