७० वर्षांपासून शिक्षक, वय १०२ वर्षे; जाणून घ्या कोण आहे मुलांना मोफत शिकवणारे हे आजोबा

0

 

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवसाआधी ओडीशामध्ये राहणाऱ्या १०२ वर्षाच्या आजोबांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या आजोबांचे नाव नंदाकिशोर प्रस्टी असे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे आजोबा..

ओडीशात राहणारे हे आजोबा शिक्षक आहे. त्यांचे वय १०२ वर्षे असले तरी अजूनही ते मुलांना शिकवत आहे. इतकेच नाही तर ते मुलांसोबतच मोठ्यांना शिकवण्याचे काम सुद्धा ते करत आहे. विशेष म्हणजे ते फक्त सातवी पास आहे.

जजपुर जिल्ह्याच्या कातिर गावात नंदा कुमार राहतात.त्यांना तिथे नंद मस्तरे म्हणजेच नंदा मास्टर ओळखले जाते. रोज सकाळी त्यांच्या घरासमोल मुले जमा होतात. त्या मुलांना नंदाकिशोर उडीयाचे अक्षर आणि गणित शिकवतात.

लहानपणी परिस्थितीमुळे त्यांना शिकता आले नाही. पण आता ते दुसऱ्या मुलांना शिकवत आहे. मुलांना आणि मोठ्या माणसांना आपली सही करता यावी यासाठी ते प्रयत्न करत असतात. ते सकाळपासून शिकवायला सुरुवात करतात तर ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लोकांना आणि मुलांना शिकवत असतात.

नंदाकिशोर जेव्हा लहान होते, तेव्हा ते आपल्या काकांच्या घरी राहायचे. तिथेच त्यांनी आपले सातवे शिक्षण घेतले होते. पण त्यानंतर त्यांचे काका कटकला शिफ्ट झाले, पण नंदाकिशोर यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्यासोबत पाठवले नाही. त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की, नंगकिशोर यांनी शेती करावी.

शेती करत असल्यामुळे त्यांना सातवीनंतरचे शिक्षण घेता आले नाही. पण शिक्षणावरचे त्यांचे प्रेम कमी झाले नाही आणि पुढे जाऊन त्यांनी मुलांना साक्षर बनवण्याचा निर्णय घेतला.

ते काम करत असताना त्यांना रिकामा वेळ मिळत असायचा त्यामुळे त्यांनी मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यागावात कोणतीच शाळा नव्हती. त्यामुळे त्यांनी एका झाडाखालीच मुलांना शिकवण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांच्याकडे आलेले मुले त्यांचे ऐकायचे नाही, पण नंतर स्वता:हून त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी मुले येऊ लागली. गेल्या ७० वर्षांपासून ते मुलांना शिकवत आहे, पण त्यांनी अजूनपर्यंत कधीही शिकवण्याचे पैसे घेतलेले नाही.

त्यागावात आता शिक्षणाची सोय झाली आहे, तिथे मोठमोठे कॉलेज बनले आहे. पण अजूनही नंदाकिशोर यांच्यावरचा विश्वास लोकांचा कमी झालेला नाही. त्या गावातील लोक अजूनही त्यांच्या मुलांना नंदाकिशोर यांच्याकडे शिकण्यासाठी पाठवत असतात. १०२ वर्षे वय असतानाही मुलांना शिकवण्याची त्यांची जिद्द खरंच खुप प्रेरणादायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.