शिक्षकाने तयार केला शालू नावाचा रोबोट; ४७ भाषा बोलण्यात तरबेज, लोकांशीही साधणार संवाद

0

तुम्ही रजनिकांतचा रोबोट चित्रपट पाहिला आहे का? किंवा शाहरूख खानचा रावन? जर तुम्ही पाहिला असेल तर त्यात तुम्हाला रोबोट माणासांशी बोलताना दिसेल. पण तुम्ही खऱ्या आयुष्यात रोबोटला माणसांशी बोलताना पाहिले आहे का? दुसऱ्या देशात पाहिले असेल पण भारतात नाही.

पण जर एखादा रोबोट तुमच्याशी हिंदीत आणि मराठीत बोलू लागला तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. असाच एक रोबोट दिनेश पाटील यांनी बनवला आहे. ते मुळचे उत्तर प्रदेश येथील राजमलपूर येथील रहिवासी आहेत.

त्यांनी शालू नावाचा रोबोट बनवला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हा रोबोट चक्क ४७ भाषा बोलतो. दिनेश पटेल हे आयटीआय मुंबईमध्ये असणाऱ्या केंद्रिय विद्यालयात कम्प्युटर सायंन्सचे शिक्षक आहेत.

त्यांना बॉलिवूडमधील रोबोट चित्रपटातून प्रेरणा मिळाली होती. हा रोबो सोफिया रोबोट सारखा आहे. सोफिया हा हॉगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्सने बनवला होता. पटेल यांनी तयार केलेला रोबोट ३८ भाषांसह ३८ परदेशी भाषांमध्ये बोलतो.

दिनेश यांनी सांगितले की, हा रोबोट बनविण्यासाठी मला ३ वर्षांचा कालावधी लागला. त्याला बनविण्यासाठी मला ५० हजार रुपये खर्च आला आहे. शालू रोबोट प्लॅस्टिक, पुठ्ठा, लाकूड आणि ऍल्युमिनियम आणि इतर टाकाऊ वस्तुंपासून बनविण्यात आला आहे.

हा रोबोट उत्तम प्रकारे संवाद साधण्यात सक्षम आहे. हा रोबो एक प्रोटोटाईप रोबोट आहे. हा रोबोट सामान्य माणसाप्रमाणे एखाद्या व्यक्तीला ओळखू शकतो. सामान्यज्ञान आणि गणिताची उत्तरे देऊ शकतो.

शालू रोबो भावना व्यक्त करू शकतो, लोकांशी सवांद साधू शकतो तसेच हा रोबो शाळा किंवा ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यांनी आतापर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला आहे.

पण मास्कचा वापर केला तर हा रोबो आणखी सुंदर दिसेल. त्यांच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक सुप्रतिक चक्रवती यांनी शालू रोबोटचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहीले आहे की, असा रोबो शिक्षणासाठी आणि इतर क्षेत्रांसाठी वापरला जाऊ शकतो. हा रोबो पुढील पिढीसाठी आणि वैज्ञानिकांसाठी प्रेरणा ठरू शकतो. दरम्यान, दिनेश पटेल यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.