चहाची टपरी चालवून, झोपडीत राहून ‘हा’ पठ्ठ्या झाला आयआयटी पास

0

असे म्हणतात आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही, तसेच जेव्हा माणूस संघर्ष करायला शिकतो तर तो काहीही मिळवू शकतो. अशीच एक संघर्षाची गोष्ट आहे भोपाळच्या अनमोल अहिरवार याची.

अनमोल हा भोपाळच्या एका गरीब कुटुंबातुन येतो. आर्थिक परिस्थिती हालकीची असतानाही जिद्दीने अभ्यास करून त्याने आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

अनमोल एका गरीब कुटुंबातून येतो. भोपाळच्या एमपी नगरमधल्या एका झोपडपट्टीत अनमोल आणि त्याचे कुटुंबाचे सदस्य राहतात. घर चालवण्यासाठी अनमोलच्या वडिलांनी तिथेच चहाची दुकान उघडलीये. चहा विकुनच ते घर चालवत असतात.

एवढे असून पण आपल्या मुलासाठी वडील कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. अनमोलने पण आपल्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. अनमोलने सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाणारी आयआयटी-जेईई परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे अनमोलचे सिलेक्शन आयआयटी कानपुरच्या केमिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले आहे.

आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी अनमोलच्या आईवडिलांनी खूप मेहनत घेतली होती. वडील चहाची टपरी चालवतात, तर अनमोलची आई पान विकायचे काम करते. आपल्या आईवडिलांचे कष्ट पाहून अनमोल ८ ते १० अभ्यास करून त्यांच्या कामात पण मदत करतो.

अनेकदा घरात पैसे नसल्यामुळे  लोक शिक्षण सोडून काम करायला सुरुवात करतात. अनमोलचे कुटुंबात पण पैशांची अडचण असते, कारण वडील चहा विकतात तर आई पान विकते. पण पैशांची अडचण त्याने कधीही आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिली नाही आणि त्याने आयआयटी परीक्षा पास केली.

अनमोलच हा शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याला दहावीत ८७ टक्के तर बारावीत ८९ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे अनमोलची शिकण्याची जिद्द पाहून त्याच्या शिक्षकांनी सुद्धा त्याची शक्य ती मदत केली आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन क्लासेसची व्यवस्था पण त्याच्या शिक्षकांनी केली होती.

मी जर ही कठीण परीक्षा पास झालो आहे, तर त्यात माझ्या आईवडिलांचा मोठा हात आहे. माझ्या आई वडिलांना आयआयटीचा अर्थ माहीत नसेल पण त्यांनी माझ्या अभ्यासात कधीच कुठली कमी जाणून दिली नाही.

मला आयआयटी ग्रॅज्युएट होऊन आयएएस बनायचे आहे. माझ्या आईवडिलांना पण मी एक मोठा अधिकारी बनताना पहायचे आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे अनमोलने म्हटले आहे.

जिद्द आणि मेहनतीच्या बळावर माणूस आयुष्यातील कुठलीही परीक्षा पास होऊ शकतो, हे अनमोलने दाखवून दिले आहे. अनमोलची ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.