टॅक्सी ड्रायव्हर ते न्युझीलंडची पहिली भारतीय महिला पोलिस, वाचा मनदीर कौरचा संघर्षमय प्रवास

0

 

असे म्हणतात, माणसाची परिस्थिती कशीही असो, तो त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याचे ध्येय नक्की गाठू शकतो. आता हीच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. एकेकाळी टॅक्सी ड्रायव्हर असणारी एक भारतीय महिला आज न्युझीलंडची पहिली भारतीय वंशाची महिला पोलिस बनली आहे.

न्युझीलंडमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव मनदीप कौर सिद्धू असे आहे. भारतातून न्युझीलंडला टॅक्सी चालवण्यासाठी गेलेल्या मनदीप कौर आता न्युझीलंडच्या पहिल्या भारतीय महिला पोलिस अधिकारी बनल्या आहे.

मनदीप कौर यांचा जन्म पंजाबच्या मालवा जिल्ह्यात झाला होता. १८ वर्षाच्या वयातच मनदीप कौर यांचे लग्न लावून देण्यात आल होते. पण त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही आणि १९९२ मध्ये त्या आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी राहण्यासाठी आल्या.

१९९९ मध्ये मनदीप कौर ऑस्ट्रेलियाला गेल्या. तेव्हा त्यांचे वय २६ वर्षे होते. ऑस्ट्रेलियाला जाताना मनदीप कौर त्यांच्या मुलांना माहेरीच सोडून गेल्या होत्या. काही काळ ऑस्ट्रेलियात राहून त्यानंतर न्युझीलंडला शिफ्ट झाल्या आणि तिथेच टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करु लागल्या.

मनदीप कौर तिथे वूमन लॉजमध्ये राहायच्या. तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून एक माजी पोलिस कर्मचारी म्हणून काम करत होता. त्यामुळे मनदीप कौर आणि त्याची चांगली ओळख झाली होती. तो पोलिस कर्मचारी पोलिसांचे वेगवेगळे किस्से मनदीप कौर यांना सांगायचा. त्यामुळे मनदीप कौर यांना पोलिस बनण्याची इच्छा झाली आणि त्यांनी वजन कमी केले, तसेच स्विमिंग शिकली.

२००४ मध्ये मनदीप कौर यांनी न्युझीलंड पोलिसमध्ये भरती झाल्या आणि तिथे त्या कॉन्स्टेबल म्हणून काम करु लागल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांनाही न्युझीलंडला बोलावून घेतले.

कॉन्स्टेबल पदावर काम करताना त्यांनी खुप चांगले काम केले.त्यांनी नेबरहूड पोलिसिंग, कौटुंबिक हिंसाचार, गुन्हे रोखण्यास महत्वाची कामगिरी बजावली. आता त्यांच्या कामामुळे त्यांना सिनियर सर्जंटचे पद देण्यात आले आहे. त्यामुळे त्या न्युझीलंडच्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी झाल्या आहे. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.