जिद्दीला सलाम! अपघातात पाय गमावला, तरी २८०० किलोमीटर सायकल चालवून केला रेकॉर्ड

0

जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करु शकतो, आता याचे उत्तम उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या एका तरुणीने एका पायाने सायलक चालवून २८०० किलोमीटर आंतर ४३ दिवसात पार केले आहे. तिने १९ नोव्हेंबरला जम्मू-काश्मीरपासून सुरुवात केली होती, तर ३१ डिसेंबरला तान्या कन्याकुमारीला पोहचली होती.

मध्य प्रदेशच्या राडगड जिल्ह्यात राहणाऱ्या या तरुणीचे नाव तान्या डागा असे आहे. या तरुणीचे वय २५ वर्षे असून तान्याने ४३ दिवसात जम्मु काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा आपला प्रवास पुर्ण केला आहे. इतक्या कमी वेळात ही कामगिरी करणारी ती पहिली महिला पॅरा सायकलिस्ट बनली आहे.

तान्या राजगडच्या ब्यावरा शहरात राहते. २०१८ मध्ये तान्या एमबीए करण्यासाठी देहरादून गेली होती. तिथे तिचा एक अपघात झाला, त्या भीषण अपघातात तिला तिचा एक पाय गमवावा लागला होता.

देहरादूनवरुन तिला इंदोरला आणण्यात आले. तिथे तान्याच्या दोन सर्जऱ्या करण्यात आले होते. तरीही तिची प्रकृती ठिक होत नव्हती. त्यामुळे तिला दिल्लीच्या रुग्णालयात नेण्यात आले.

दिल्लीच्या रुग्णालयात तिच्यावर सहा महिने उपचार करण्यात आले. या रुग्णायलात करण्यात आलेल्या प्रत्येक सर्जरीत तिला ३००० टाके लावले जायचे.

एक पाय गमावल्यानंतर तान्या आदित्य मेहता फाउंडेशनशी जुळली, तिथूनच तिच्या सायकलिंगला सुरुवात झाली. एका पायाने सायकल चावताना तिला सुरुवातीला खुप त्रास झाला, अनेकदा एका पायाने सायकलिंग करताना तिच्या पायातून रक्तही यायचे.

तान्याच्या समोर कितीही अडचणी आल्यातरी तिने कधीही हार मानली नाही. तान्याने १०० किलोमीटर सायकलिंग करुन टॉप टेन सायकलिस्टमध्ये आपली जागा बनवली.

फाउंडेशनकडून तिला बीएसएफद्वारा आयोजित करण्यात आलेल्या ‘इनफिनीटी राइड सायकलिंग’बद्दल माहिती मिळाली होती. ३० सायकलिस्ट ग्रुपमध्ये ९ पॅरा सायकलिस्ट होते. इतक्या लांबच्या सायकलिंग प्रवासाबद्दल केल्याबद्दल तान्याला बीएसएफद्वारा सन्मानित करण्यात आले होते.

१९ नोव्हेंबरला सायकलिंगचा प्रवास तान्याने सुरु केला होता, पण प्रवास पुर्ण होण्याआधीच म्हणजेच १८ डिसेंबरला अचानक तिच्या वडिलांचा मृत्यु झाला, तिला या गोष्टीचे खुप दु:ख झाले. पण तिच्या कुटूंबाने आणि कोचने तिला राइडिंग पुर्ण करण्यास सांगितले.

२५ डिसेंबरला तिला कोच तिच्या घरी राजगडला घेऊन गेले होते, घरुन आल्यानंतर तिने पुन्हा आपल्या सायकलिंगला सुरुवात केली. आपल्या मेहनतीच्या जोरावर तान्याने खुप कमी वेळात २८०० किलोमीटर आंतर पुर्ण करुन एक विक्रम आपल्या नावे केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.