लोकांना २० रुपयांना विकतेय ‘ही’ महिला बिर्याणी, तर गरिबांना फुकटातच देते जेवण

0

 

सध्या समाजात खूप कमी लोक अशी असतात असतात, जी आपल्या कुटुंबासोबतच समाजातल्या गरजू लोकांचाही विचार करतात. तसेच त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात.

असे म्हणतात की, भुकेलेल्या अन्न देणे पुण्याचे काम आहे. त्यामुळे अनेकदा लोक एक-दोन दिवसांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतात. पण आजची ही गोष्ट अशा एका तरुणीची आहे जी रोज भूकलेलेल्या माणसांना फुकटात जेवण देत आहे. ही मुलगी तामिळनाडुची आहे.

तामिळनाडूच्या कोयंबटूरमध्ये राहणारी या महिलेने आपल्या घराच्या समोर बिर्याणी स्टॉल उभे केले आहे. पण जेव्हा पण कोणी तिच्या स्टॉलवर गरजू माणूस येतो आणि त्याच्याकदे जार पैसे नसतील तर ती त्याला मोफतमध्ये जेवण देते.

ही महिला आपल्या घरासमोर लावलेल्या बिर्याणी स्टॉलवर २० रुपयांना विकते. जर ती तिच्या स्टॉलवर कोणी भुकेलेला माणूस आला असेल आणि त्याच्याकडे जर बिर्याणी घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतील तर ती त्या  लोकांना ती पोट भरेपर्यंत मोफत जेवण देते.

माझे काम लोकांना अन्न पुरवणे आहे. मी बिर्याणीचे पॅकेट २० रुपयांना विकते. पण अनेकदा माझ्या स्टॉलवर असे लोक येतात ज्यांच्याकडे  जेवणासाठी पैसे नसतात, त्यांना मोफक बिर्याणी देते, असे त्या महिलेने म्हटले आहे.

भुकमारीने अनेक लोकांचे मृत्यु होतात. काही लोकांची आर्थिक परिस्थिती खुप हालाकीची असते, त्यामुळे त्यांना दोन वेळचे जेवण मिळवणे ही कठीण असते, अशा लोकांसाठी अन्नदान केले पाहिजे. आता कोयंबटूरमध्ये राहणाऱ्या या महिलेचे अन्नदानाचे  काम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.