युट्युबवर व्हिडीओ पाहून ‘या’ गृहिणीने केला एक भन्नाट प्रयोग; आता महिन्याला कमवतेय मोक्कार पैसे तेही घरी बसून

0

 

लॉकडाऊन काळात सर्वच जणांना घरी राहावे लागले होते, अनेकांनी वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या तर अनेकांनी नवनवीन प्रयोग केले. काहींनी तर नवीन दिशेस बनवल्या आणि आपल्या कलेचा वापर करून नवीन उपयोग सुरू केले.

आजची ही गोष्ट अशाच एका महिलेची आहे, जिने लॉकडाऊनमध्ये टाइमपास म्हणूनएक प्रयोग करून पाहिला आणि त्या प्रयोगानेच ती महिला आता चांगली कमाई करू लागली आहे. या महिलेचे नाव स्वाती पुरोहित. त्या राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहतात.

स्वाती यांना स्वयंपाक बनवण्याची आवड आहे. तसेच त्या नवनवीन पदार्थ बनवण्यासाठी उत्सुक असतात. लॉकडाऊन काळात त्यांना केक बनवायची इच्छा झाली. त्यामुळे त्यांनी युट्युबवर केकच्या व्हिडीओ बघितल्या आणि केक बनवला. त्यांच्या केकचा प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांनी घरीच केक बनवून विकण्याचा निर्णय घेतला.

बघता बघता त्यांची केक विकून चांगलीच कमाई सुरू झाली आणि आता त्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहे. स्वाती यांनी तयार केलेला थीम केक लोकांना जास्त आवडतो.  स्वाती यांनी तयार केलेला केक घेण्यासाठी जोधपूरला अनेक लोक लांबून लांबून येतात.

त्यांनी केकची मार्केटिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. स्वाती एक गृहिणी असल्याने त्यांनी घरच्या कामांसोबत केकची मार्केटिंगही केले.

त्यांनी सुरुवातीला फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज सुरू केले. त्यावर वेगवेगळे केकच्या डिझाइन्सचे फोटो त्यांनी पोस्ट केले. लोकांनी त्यांच्या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिला आणि त्यामुळे त्यांच्या ग्राहकांची सुद्धा चैन बनत गेली.

स्वाती यांना सध्या दिवसाला २-३ केकच्या ऑर्डर्स मिळतात. एका केकची किंमत साधारणपणे ७०० ते १५०० रुपये इतकी आहे. तसेच जर थीम केकची ऑर्डर असली तर ते जास्त पैसे घेतात. त्यांच्या या घरगुती व्यवसायामुळे आता यशस्वी उद्योजिका बनल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.