अभिनामास्पद! मुंबईच्या चाळीत राहणारी तरुणी झाली नासाची कर्मचारी

0

 

माणसामध्ये ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर त्याची परिस्थिती कशीही असो एक दिवशी तो त्याच्या नक्की गाठतो, असे अनेक उदाहरण आपण पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणीची गोष्ट सांगणार आहोत जी एकेकाळी मुंबईच्या चाळीत राहत होती, पण आज ती नासाची कर्मचारी म्हणून काम करत आहे.

मुंबईच्या बीबीडी चाळीतील १८० स्क्वेअर फुट घरामध्ये राहणाऱ्या या तरुणीचे नाव सुवर्णा कुराडे आहे. आता तिचे नासा या जागतिक संशोधन संस्थेत काम करण्याचे तिचे स्वप्न आता पुर्ण झाले आहे.

सुवर्णा तशी सामान्य कुटुंबातलीच आहे. तिचे वडिला पोलिस खात्यामध्ये कार्यरत होते. मुंबईच्या चाळीत वाढलेल्या सुवर्णा यांनी पालिकेच्या शाळेतूनच आपले शालेय शिक्षण सुरु केले.

शाळेत शिकताना तिला मारुती शेरेकर नावाचे एक शिक्षक लाभले. त्यांनी सुवर्णा ही उंच भरारी घेणारी मुलगी आहे, हे ओळखले होते, तसेच त्यांच्यासोबच तिचे दुसरे शिक्षक धनाजी जाधव यांनी दोघांनी मिळून तिला जास्तीची शिकवणी देण्यास सुरुवात केली.

सुवर्णाला दहावीच्या परिक्षेत ८८.१४ टक्के मिळाले. त्यानंतर तिने स्वत:चीच निवड प्रतिस्पर्धी म्हणून निवड केली होती. सुवर्णा यांनी वांद्रे पॉलिटेक्निकमधून इंजिनियरींगमधून डिप्लोमा पुर्ण केला. त्यानंतर तिने तिथे नोकरी करताना कॉम्प्युटर इंजिनियरींग केली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले आणि त्या अमेरिकेत गेल्या.

त्यांना शिकण्याची खुप इच्छा होती, त्यामुळे तिथे जाऊन त्यांनी सर्व्हर ओएस, सिस्को सर्टिफिकेट नेटवर्किंगचा अभ्यासक्रम पुर्ण केला. तसेच त्या क्लाउड कम्प्युटींगमध्ये अझूर सोल्युशन आर्किटेक तज्ञ आहे. त्यांची ही गुणवत्ता बघूनच त्यांना नासाने क्लाउड कम्प्युटींग प्रकल्पात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची निवड केली आहे.

पालिकेच्या शाळेत शिकणारी विद्यार्थी असो वा अन्य कोणत्या शाळेतील विद्यार्थी कोणालीही कमी समजलं नाही पाहिजे, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय ठरवले आणि त्या ध्येयामागे धाव घेतली तर लवकरच त्याला यश मिळते, असे सुवर्णाने म्हटले आहे. सुवर्णाची नासामध्ये निवड होणे ही महाराष्ट्रासाठीच नाही, तर पुर्ण भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.