सोनिया गांधींनी असे काय केले होते की, सुषमा स्वराज म्हणाल्या, मी केस कापून भिक्षुक बनेल…

0

 

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या एक चांगल्या वक्ता म्हणून प्रसिद्ध होत्या. त्या भाषणात जितक्या आक्रमक दिसायच्या तितक्याच सरळ आणि साध्या त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यात होत्या. हा त्यांच्याच आयुष्यातला २००४ चा किस्सा आहे.

१९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची १३ महिन्यानंतर सरकार पडली. त्यामुळे १३ व्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होती. तेव्हा काँग्रेसची कमान सोनिया गांधी यांच्या हातात होती. मात्र शरद पवार यांनी पंतप्रधान पदासाठी विदेशी वंशाची महिला नको होती. त्यामुळे शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली.

याच मुद्द्याचा फायदा सुषमा स्वराज यांनी या लोकसभा निवडणुकीत घेतला. यात त्यांना यात यश मिळाले नाही, आणि सुषमा ५६ हजार मतांनी हारल्या. मात्र त्यांना वाजपेयी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या हातून सत्ता गेली. काँग्रेस २००४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून आली. तेव्हा सुषमा स्वराज यांनी वाटले की सोनिया गांधी पंतप्रधान बनणार आहे.

तेव्हा त्यांनी सोनिया गांधीविरोधात घोषणाबाजी केली होती. जर सोनिया गांधी पंतप्रधान झाली तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईल, आपले केस कापून एका भिक्षुकचे जीवन जगेल, कदाचित एखाद्या नेत्याने अशा प्रकारची घोषणा केली होती. मात्र असे काही झाले नाही कारण सोनिया गांधी यांच्या ऐवजी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्यात आले.

सप्टेंबर २०१३ मध्ये सुषमा स्वराज यांनी पुन्हा सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाविषयी भाष्य केले होते. मी नेहमीच असे म्हटले आहे की इंदिरा गांधी यांची सून आणि राजीव गांधी यांची पत्नी म्हणून सोनिया गांधी आपल्या देशात आल्या आहे, त्यामुळे त्या नेहमीच आपल्या प्रेमास आणि आपुलकीस पात्र आहे.

तसेच सोनिया गांधी या कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून आमच्या आदरास पात्र आहेत, पण जर त्यांना पंतप्रधान व्हायचे असेल तर मला ते योग्य वाटत नाही, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, सुषमा स्वराज या कणखर नेत्या होत्या. अनेक महिलांच्या त्या आयडॉल होत्या. मात्र सुषमा स्वराज यांचे २०१९ मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.