नाद खुळा! शेतकऱ्याने बनवली इलेक्ट्रीक कार, एका चार्जमध्ये चालणार ३०० किलोमीटर

0

 

 

सध्या देशात दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहे. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढत चालली आहे. अशात एका शेतकऱ्याने लॉकडाऊनचा सदुपयोग करुन इलेक्ट्रीक कार तयार केली आहे.

ओडिसाच्या मयुरभंजमध्ये राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव सुशील अग्रावाल असे आहे. सुशील यांनी इलेक्ट्रीक कार तयार केली असून ही कार एका चार्जमध्ये ३०० किलोमीटर चालते.

सुशील यांनी जेव्हा कार बनवण्यास सुरुवात केली होती, तेव्हा लॉकडाऊन सुरु होता. सिंगल चार्जमध्ये ही कार ३०० किलोमीटर चालते. त्यांनी या कारमध्ये ८५० व्हॅटची मोटर लावली आहे.

ही कार चालवण्यासाठी १००एच/५४ व्हॉल्ट्सची बॅटरी त्यांनी या कारमध्ये लावलेली आहे. ही बॅटरी सौर उर्जेवर चार्ज होते. ही पुर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी ८ तास लागतात पण एकदा चार्ज झाल्यावर ३०० किलोमीटर चालते. त्यामुळे शेतकऱ्याची कार सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला होता.

सुशील यांनी तयार केलेली बॅटरीची लाईफ १० वर्षांची आहे. त्यामुळे दुसऱ्या कारपेक्षा सुशील अग्रवाल यांची कार अधिक सोईस्कर आणि परवडणारी आहे.

ही कार बनवण्याची सुरुवात त्यांनी लॉकडाऊनध्ये केली होती. तसेच कारला बनवण्यासाठी त्यांनी दोन मॅकेनिकच्या मदतीने आणि एका मित्राची मदत घेतली होती. त्यांच्या मदतीनेच सुशील यांनी मोटर वाईडींग, इलेक्ट्रीक फिटींग आणि चेसिंगचे काम केले आहे.

लॉकडाऊन झाल्यानंतर सुशील अग्रवाल यांना लक्षात आले होते की लॉकडाऊन संपल्यानंतर पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी लॉकडाऊनमध्येच इलेक्ट्रीक कार बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी ही कार बनवण्यास युट्युबची मदत घेतली होती.

सुशील अग्रवाल यांनी तयार केलेल्या कारची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. अशात मयुरभंज आरटीओ अधिकारी गोपाल कृष्णदास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुशील यांनी लॉकडाऊनमध्ये सौरउर्जेवर चालणारी कार तयार केली ही खुप आनंदाची बाब आहे. सगळ्यांनी अशा प्रयोग करणाऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.