महिन्याला हजार रूपयांत मजदूरी करणारा सुर्या कसा झाला साऊथचा सुपरस्टार, वाचा संघर्षकथा

0

आज आम्ही तुम्हाला साऊथच्या सिंघमची यशोगाथा सांगणार आहोत जो एक चित्रपटासाठी २५ कोटींचे मानधन घेतो. साऊथचा सुपरस्टार सुर्या हा जरी प्रसिद्ध अभिनेता शिवकुमार यांचा मुलगा असला तरी त्याला चित्रपटात येण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला होता.

सुर्याला चित्रपटात आजिबात रस नव्हता. सिनेमात रस नसल्याने त्याने एका कपड्याच्या कारखान्यात काम करण्यास सुरूवात केली. हे करताना त्याने हे लपवले होते की तो अभिनेता शिवकुमार यांचा मुलगा आहे.

जवळपास या कारखान्यात सुर्याने ८ महिने काम केले होते. या कामाचा मोबदला म्हणून त्याला दर महिन्याला हजार रूपये मजदूरी मिळत असे. सुर्याने वयाच्या २० व्या वर्षी चित्रपटात पदार्पन केले होते.

१९९५ साली असाई या चित्रपटात सुर्याने मुख्य अभिनेत्याची ऑफर मिळाली होती. पण सुर्याला चित्रपटात काम करण्याची काहीच आवड नव्हती त्यामुळे त्याने या ऑफरला नकार दिला होता. यानंतर जवळपास २ वर्षांनंतर दिग्दर्शक वसंत यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी सुर्याला मिळाली.

या चित्रपटाचे नाव होते नेररूक्कू नेर. या सिनेमाचे निर्माते मनिरत्नम होते. या सिनेमाला सुर्या नकार देऊ शकला नाही आणि त्याने टॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण दाक्षिणात्य सुपरस्टार बनण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागली होती.

सुरूवातीच्या दिवसांत काम करताना सुर्याला खुप संघर्ष करावा लागला आहे. ऍक्शन, डान्स, आत्मविश्वासाची कमी असल्यामुळे त्याला एखादा सीन शूट करताना खुप त्रास होत होता. त्याला त्यावेळी अभिनय जमत नव्हता.

त्यावेळी सुर्याचे गुरू रघुवरन यांनी त्याला यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. वडिलांपेक्षा स्वताची वेगळी ओळख कशी निर्माण करता येईल यासाठी त्यांनी सुर्याला मदत केली. २००१ साली रिलीज झालेला नंदा हा चित्रपट हीट झाला आणि सुर्याच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट होता.

या सिनेमातील अभिनयासाठी त्याला तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. २०१० साली सुर्याने रक्तचरित्र या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर सुर्याने कधी मागे वळून पाहिले नाही.

आज सुर्याचे अनेक चाहते आहेत. सुर्या त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.