डेली इनकम मॉडेलची शेती करुन ‘हा’ शेतकरी करतोय रोजची कमाई, वर्षाला कमवतोय ३० लाख

0

 

शेती करुन उत्पन्न मिळवायचे असेल तर काही काळ थांबावे लागते, पण आता सर्व काही बदलत चालले आहे, शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करुन कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, जो शेती करुन वर्षाला ३० लाखांची कमाई करत आहे.

हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव सुरेश गोयल असे आहे. सुरेश गेल्या ७ वर्षांपासून डेली इनकम मॉडेलवर शेती करुन लाखोंची कमाई करत आहे. त्यांनी १२ पेक्षा जास्त प्रकारचे पीक शेतात पीकवले आहे, त्यामुळे त्यांनी एकाच वर्षात तब्बल ३० लाख रुपये कमवले आहे.

३२ वर्षे त्यांनी व्यवसाय केला, त्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तर त्यांच्याकडे शेती सुद्धा नव्हती, पण आता ते पुर्णपणे शेतकरी बनले आहे. ते १८ एकर शेतीत शेती करत आहे.

सुरेश यांच्या गावातील लोक ट्रान्मपोर्टचा व्यवसाय करतात, त्यामुळे सुरेश सुद्धा शिक्षणानंतर चेन्नईला गेले आणि त्यांनी ट्रान्सस्पोर्टचा व्यवसाय सुरु केला. ३० वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला, त्यानंतर पुढे त्यांनी हा व्यवसाय भावांकडे सोपवून दिला आणि ते गावी परतले.

गावी आल्यानंतर ते कृषी विद्यालयांमध्ये गेले, तिथे त्यांनी शेतीची माहिती घेतली. तसेच त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि शेतीबाबत जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी गावात ७ एकर जमीन खरेदी केली आणि शेती करण्यास सुरुवात केली.

आज त्यांच्या बागेत पेरु, मोसंबी, लिंबू, सफरचंद. संत्री, अशा १५०० प्रकारच्या फळांची झाडे त्यांच्या बागेत आहे. तसेच त्यांनी आता त्यांच्या शेतात २० लोकांना रोजगारही दिला आहे.

सुरेश यांनी डेली इनकम मॉडेलची शेती केली आहे. शेतीतून रोज काही ना काही उत्पन्न मिळून रोज कमाई झाली पाहिजे, असे सुरेश यांचे म्हणणे आहे. त्यांनी वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केली आहे. ते आपल्या बागेत बाजार सुद्धा भरवतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भाज्या आणि फळे विकता येतात.

Leave A Reply

Your email address will not be published.