सुनीता गांधी: अशी शिक्षिका जी गरीब मुलांना तीस तासात बनवत आहे साक्षर, वाचा कसे…

0

केवळ ३० तासात कोणाला साक्षर होताना पाहिले आहे का? तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण मागील पाच वर्षांपासून लखनऊमध्ये एक शिक्षिका सुनीता गांधी असे करत आहेत. सुनीता गांधी आशा मुलांना शिक्षा देतात ज्यांना शाळेत जायला परवडत नाही किंवा जी मुलं शाळेत जात नाहीत.

यासाठी त्या कोणतीही फी आकारत नाहीत उलट त्या सगळ्यांना मोफत शिक्षण देतात. त्यांचे असे म्हणणे आहे की आता हे ३० तासांचे मॉडेल त्यांना पूर्ण देशभर राबवायचे आहे. त्या म्हणाल्या की पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत २० राज्यात हे मॉडेल पोहोचवायचे माझे लक्ष आहे.

असे जर झाले तर कमीत कमी २० लाख अशा मुलांना शिक्षण मिळेल जे शाळेत जात नाहीत. सुनीता गांधी यांचे ग्लोबल ड्रीमशाला सध्या पूर्णपणे स्वयंसेवक चालवत आहेत. त्यांचा हा फॉर्म्युला एका सिद्धांतावर आधारित आहे.

सर्वात आधी मुलांना हे विचारा की तुम्हाला काय येतं? आणि त्यावरून पुढील काम सुरू करा. यातून सगळ्या मुलांना समान संरचना लागू होते. साक्षर कार्यक्रमाचे ट्रेनर टॉम हेलानी म्हणाले की, माझे काही विद्यार्थी असे आहेत की ते शाळेत जात असतानासुद्धा निरक्षर आहेत.

त्यांना सांगण्यात आले आहे की तुम्ही नालायक, बेकार आणि वात्रट मुले आहेत. पण असे नाहीये ती हुशार मुले आहेत. ती मुले चित्रे ओळखतात, शब्दांना ओळखतात. आम्ही हे जाणण्याचा प्रयत्न करतो की त्यांना काय माहिती आहे आणि काय नाही.

प्रत्येक सत्र हे पंधरा मिनिटापेक्षा जात वेळाचे नसते. कारण गरीब मुले आपला जास्त वेळ देत नाहीत. मुलांना आम्ही त्या गोष्टी सांगतो ज्या गोष्टींबद्दल ते सारखे प्रश्न विचारत असतात. उदाहरणार्थ जेव्हा मुलगा शब्दांना ओळखत असतो तेव्हा फक्त अक्षरांना ओळखायची गोष्ट होत असते.

त्यासाठी आम्ही एक ५० रुपयांची स्वस्त टूलकिट आणली आहे. यामध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीत काही चित्रे आहेत. त्यामध्ये ३० धडे आहेत. ६० व्हीडिओ, पुस्तके, बाराखडी आणि स्टेशनरीच्या काही वस्तू आहेत.

ही संकल्पना खूप चांगली आहे. विशेष म्हणजे गरीब मुलांसाठी ज उपक्रम खूप चांगला आहे. सुनीता गांधींना या उपक्रमाअंतर्गत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या कामाला अनेक जणांनी मदत केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.