साताऱ्याच्या ‘या’ पठ्ठ्याची मुकेश अंबानी यांना टक्कर; कारनामा बघून तुम्ही पण हैराण व्हाल

0

 

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी सध्या सर्व क्षेत्रात डिजीटलीकरण करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यांनी दुकानदारांनादेखील डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणले आहे. त्यासाठी अंबानी यांनी जिओ मार्ट अ‍ॅपची स्थापना केली होती.

मुकेश अंबानी यांनी लाँच केलेले हे अ‍ॅप लोकांना एवढे पसंत पडले नाही. अशात महाराष्ट्रातील साताऱ्याच्या पठ्ठ्याने जिओ मार्टला टक्कर देण्यासाठी दुकान अ‍ॅपची सुरुवात केली आहे. हे अ‍ॅप लोकांना चांगलेच पसंत पडले आहे. त्यामुळे दुकान अ‍ॅप मुकेश अंबानी यांच्या जिओ मार्टला चांगलीच टक्कर देताना दिसून येत आहे.

दुकान अ‍ॅप तयार करणाऱ्या या तरुणाचे नाव सुमित शाह असे आहे. सुमित हा सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहतो. सुमितने तयार केलेले हे अ‍ॅप लोकांना चांगलेच पसंत पडले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने दुकानदार आपल्या वस्तू सोशल मीडियावर शेअर करुन विकू शकतात.

दुकान अ‍ॅपने लहान आणि मध्यमवर्गीय उद्योगपतींसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. दुकान या अ‍ॅपने दुकानदारांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले आहे. तसेच तांत्रिकदृष्ट्या कशाप्रकारे सोप्या आणि चांगल्या सुविधा देता येईल याकडे लक्ष दिले आहे, असे सुमित शाहने म्हटले आहे.

चांगल्या सुविधा दिल्यामुळे हे अ‍ॅप लोकांना चांगलेच पसंत पडले आहे. त्यामुळे दुकानदारांनीसुद्धा या अ‍ॅपला चांगला प्रतिसाद दिला आहे. हे अ‍ॅप सहा महिन्यात ४.३ मिलीयन म्हणजेच ४३ लाखपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलेले आहे.

तुम्ही हे अ‍ॅप कसे वापरु शकतात…

हे अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर दुकानदाराला आपला व्यवसाय नोंदवावा लागतो. यासाठी ३० सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. नोंदणी केल्यानंतर दुकानदाराला कस्टमर स्टोअर लिंक मिळते. या लिंकवर दुकानदार आपल्या सर्व वस्तुंविषयी माहिती देऊ शकतो.

हि स्टोअरची लिंक दुकानदार व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साईट्सवर शेअर करु शकतात. या अ‍ॅपचा वापर प्रत्येक दुकानदार करु शकतो. तसेच मोठमोठे दुकानदार म्हणजेच रेस्टॉरंट, सोने आणि फर्निचरयांसारखे व्यवसायिकदेखील याचा उपयोग करु शकतात. यासोबतच छोटे दुकानदार फळे, भाज्या, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्री या अ‍ॅपच्या माध्यमातून करु शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.