माणूसकीला सलाम! या माणसाने आतापर्यंत २ लाख गायी, ८ हजार कुत्रे, तर ६०० उटांची केलीय रक्षा

0

 

कोरोनाच्या संकटात लोकांवर आर्थिक संकटही आले होते, त्यामुळे अनेकांच्या दोन वेळचे जेवण मिळवणेही कठिण झाले होते, अशात सरकारकडून लोकांना जेवण पुरवले जात होते, पण मुक्या प्राण्यांचा कोणी विचार करत नव्हता, अशा परिस्थितीत एक माणूस मुक्या जनावरांसाठी कर्ता-धर्ता ठरला आहे.

या माणसाचे नाव सुजीत चौधरी असे आहे. पटनामध्ये राहणाऱ्या सुजीतचे प्राण्यांवरील प्रेम बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सुजीत पटनामध्ये गेल्या १९ वर्षांपासून राहत आहे. ते एका कंपनीत काम करत असून जेवढ्या वेळ ते काम करतात, त्यापेक्षा जास्त वेळ ते जनावरांची मदत करताना दिसतात.

रस्त्यावर असलेल्या कुत्र्यांना, गायांना तसेच दिसत असणाऱ्या प्रत्येक जणावरांनी सुजीत खायला देतात. तसेच जर कोणत्या प्राण्याला जखम झाली असेल, त्यांची मलमपट्टी करण्याचे काम करतात.

काही जनावरांना मलमपट्टी केल्याने फरक पडत नसेल, तर त्यांना सुजीत जनावरांच्या दवाखान्यात घेऊन जातात. जर एखाद्या मृत्यु झाला, तर त्या जनावराचे शव ते सन्माने घेऊन जातात आणि त्यांचा अंत्यासंस्कार करतात.

सुजीत मुक्या जनावरांची फक्त सेवाच करत नाही, त्यांना खायलाही देतात. तसेच ते विविध पक्ष्यांसोबतच वेगवेगळ्या जनावरांचा उपचारही घरच्या घरीच करतात. गेल्या १८ ते २० वर्षांपासून सुजीत हे कान करत आहे.

सुजीत हे एका सामान्य परिवारातूनच येतात. त्यांचीही अशीच इच्छा होती की आपल्या खिशात पैसे असावे, आपण पण आपल्या कुटुंबासोबत मौजमजा करावी, पण त्यांच्या लक्षात आले की भटकत असलेल्या जनावरांचा विचार कोणीही करत नाही, त्यामुळे त्यांनी जनावरांची मदत करण्याचा निर्णय घेतला, सुजीत आता गरज असेल तेवढे पैसे कमवतात आणि उरलेल्या वेळेत जनावरांची मदत.

सुजीत यांनी बीएसएफ आणि एसएसबी यांच्यासोबत मिळून आतापर्यंत १.५ ते २ लाख गायींची, ७ ते ८ हजार कुत्र्यांची, तर ६०० पेक्षा जास्त उटांची रक्षा केली आहे, त्यांनी लॉकडाऊनमध्येही रस्त्यावर असणाऱ्या जणावरांची काळजी घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.