याला म्हणतात वुमन पावर! १ शेळी ते १६५ म्हशींपर्यंतचा प्रवास आणि कोटींपर्यंतची उलाढाल

0

आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला अशा महिलेची यशोगाथा सांगणार आहोत जिने अवघ्या ७०० रूपयांतून तिचे स्वताचे एक विश्व उभे केले आहे. फक्त २५ रूपये महिन्याला जमा करणाऱ्या बचतगटाकडून एका महिला सदस्याने सातशे रूपयांचे कर्ज घेतले होते.

त्यांनी त्यातून एक शेळी विकत घेतली आणि आता त्यांच्याकडे १६५ म्हशी आहेत. या म्हशींपासून दररोज १६५ लीटर दुध मिळते. दुधाच्या पदार्थांपासून आणि त्यांच्या विक्रीतून होणारी आज त्यांची वार्षिक उलाढाल १ कोटींच्या घरात आहे.

एखादे रोपटे लावल्यानंतर त्याचा वटवृक्ष कसा तयार होतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. यशाला गवसणी घातलेल्या या महिलेचे नाव आहे विमल नारायणगाव इथ्थर. त्यांचा प्रवास खुप संघर्षमयी होता.

त्या लाडगाव येथील रहिवासी आहेत. औरंगाबाद जालना महामार्गावर हे एक छोटेसे गाव आहे. गावात विमलबाईंना सगळे लोक ओळखतात. २५ ते ३० वर्षांपुर्वी त्यांच्याकडे फक्त दीड एकर जमीन होती. त्यांचे कुटुंब बरेच मोठे होते.

त्यांचे पती एका कंपनीत चालक म्हणून कामाला होते. ते सतत बाहेरच असत कारण त्यांचे कामच तसे होते. त्यांची मुले लहान होती. त्यांना दुध मिळत नव्हते. म्हशीचे दुध विकत घेण्याइतकी त्यांची परिस्थिती नव्हती.

अशावेळी विमलबाई यांच्या मनात संसाराचे चित्र बदलण्याचा विचार आला. तेव्हा गावातील महिलांना एकत्र येऊन बचत गट सुरू करण्याची सुचना एका व्यक्तीने केली. बचतगटासाठी विमलबाई यांनी महिन्याला २५ रूपये दिले.

मग त्यांच्या मनात विचार आला की आपण शेळी पाळली पाहिजे. त्यांना बचतगटातून ७०० रुपये मिळत होते पण ७०० रुपयात शेळी विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करण्याचे ठरवले.

पण ७०० रूपयात अगदीच साध्या प्रकृतीची शेळी त्यांनी विकत घेतली. शेळी घेतल्यानंतर त्यांचे जीवन बदलले. त्यांचे पती आता सगळे कामकाज पाहतात. पहाडेपासून त्यांचा दिवस सुरू होतो. त्यांच्या हाताखाली काही मजूर काम करतात.

त्यांचा एक मुलगा दुध पोहोचवतो तर एक पोरगा हिशोब ठेवतो. दररोज अकराशे ते साडे अकराशे दुधाचे उत्पादन होते. म्हशींना उत्तम चारा आणि खाद्य दिले जाते. गोठ्यांची स्वच्छताही राखली जाते. या दुधातून होणारी वार्षिक उलाढाल ही १ कोटींपेक्षाही जास्त आहे. पशु हे धन आहे असे विमलबाई म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.