भुकंपानंतर जपानच्या लोकांना गाड्यांची गरज भासू लागली आणि सुरू झाली टोयोटा कंपनी

0

सध्या जरी टेस्ला जगातील सर्वात मोठी कार बनवणारी कंपनी बनली असली तरी त्याआधी टोयोटा ही जपानी कंपनी जगातील सर्वात मोठी कार विक्रेता कंपनी बनली होती. २०२० मध्ये टोयोटोने ९५.२८ लाख मोटारींची विक्री केली होती.

पण कोरोनामुळे त्यांच्या विक्रीत ११.३ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यानंतर फॉक्सवॅगन कंपनीचा नंबर लागतो. या कंपनीने एकूण ९३.०५ लाख गाड्यांची विक्री केली होती. मिळालेल्या माहितीनुसार टोयोटोला १ नंबरचे स्थान मिळविण्यासाठी ५ वर्षे गेली.

आज आम्ही तुम्हाला टोयोटा कंपनी कधी सुरू झाली, तिचा इतिहास काय आहे हे सांगणार आहोत. लेखक प्रदीप ठाकूर यांच्या टोयोटा सक्सेस स्टोरी या पुस्तकात असे लिहीले आहे की १ सप्टेंबर १९२३ रोजी जपानमध्ये मोठा भुकंप आला होता.

असे म्हणतात की त्या भुकंपाने लोकांची विचारसरणीच बदलून टाकली होती. त्या भुकंपाने खुप नुकसान झाले होते. त्यावेळी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी मोटारींचा वापर केला जात होता. मग इथल्या लोकांना गाड्यांची किंमत कळाली आणि त्यांचा कल गाड्यांकडे जास्त वाढला.

टोयोटाचे संस्थापक किइचिरो यांनी १९३३ मध्ये प्रथम ऑटोमेटिक हातमाग बनविला होता. पण त्यांना लहानपणापासूनच कार बनवायची इच्छा होती. मग त्यांनी कारचे प्रोटोटाइप मॉडेल एए १९३२ बनविले. पण त्यांनी सुरूवातील कार असेंबल केल्या होत्या.

त्यानंतर १९३६ मध्ये त्यांनी कंपनीची पायाभरणी केली होती. टोयोटोची सर्वात लोकप्रिय एसयुव्ही लँड क्रुझर १९५१ मध्ये सादर करण्यात आली होती. टोयोटा आपल्या गुणवत्तेवर जास्त भर देत होते. वाहनाचा आणि उत्पादनाचा खर्च जेवढा कमी ठेवता येईल तेवढा त्यांनी कमी ठेवण्याचा प्रयत्न केला.

हळूहळू टोयोटा हा मोठा ब्रँड बनत गेला आणि त्यांच्या कार्सची मागणी वाढत गेली. सुरूवातीला त्यांचे लक्ष्य मिल्ट्री ट्रक बनविण्याचे होते. जपानच्या सैन्याने त्यांच्या ट्रकचा खुप वापर केला होता. दुसरे महायुद्ध १९४५ संपले.

जपानची परिस्थिती खुप बिकट झाली होती. त्यावेळी टोयोटाने दिवाळखोरीचा अर्जही दाखल केला होता. त्यानंतर किइचिरो यांनी बँकेशी करार केला आणि कंपनी वाचविण्यात यश आले. पण नियम कडक असल्यामुळे त्यांना कॉस्ट कटिंग करावी लागली होती.

त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आणि त्यांनी संप केला होता. दोन महिने हा संप चालू राहिला होता. कंपनीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांना खुप त्रास सहन करावा लागला. त्यावेळी अनेक गृहयुद्धे चालू होती.

अशा परिस्थितीत बऱ्याच देशांना मिल्ट्री ट्रकची आवश्यकता होती. त्यानंतर टोयोटा पुन्हा चर्चेत आली. १९६३ मध्ये त्यांचा विस्तार होऊ लागला. प्रथमच कंपनीने १ दशलक्ष कारची निर्यात केली होती. १९९१ पर्यंत टोयोटाने १ लाखांहू अधिक वाहने अमेरिकन बाजारात विकल्या होत्या.

टोयोटा सुरूवातीला सर्वात स्वस्त कार विकणाऱ्या कंपनीमधील एक कंपनी होती. टोयोटाने २००० मध्ये अनेक कंपन्यांशी करार केला आणि त्यांचा व्यवसाय अनेक पटींनी वाढला. २०१७ मध्ये टोयोटा कंपनी आर्टिफिशल इंटेलिजेंसच्या माध्यमातून कार बनवायला सुरूवात केली. आज टोयोटा जगातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी बनली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.