बापाची ढोर मेहनत पाहवली नाही; शाळेत शिकणाऱ्या मुलाने जिद्दीने उभी केली कोट्यावधींची कंपनी

0

अनेकदा घरच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शिकताना अडचणी येत असतात. तसेच अनेक मुलामुलींना आपल्या घरची परिस्थिती बघवली जात नाही, आणि ती बदलण्यासाठी लहान वयापासूनच अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. अशीच एक गोष्ट आहे, मुंबईच्या तिलक मेहताची.

तिलक आठवीत शिकत असताना त्याने कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करणारी कंपनी खोलली. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. इतक्या कमी वयात तिलक हा कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा मालक झाला आहे.

तिलकने २०१८ मध्ये पेपर्स अँड पार्सल्स नावाची कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी ग्राहकांना त्यांच्या वस्तूंची डिलिव्हरी करून देते. त्याने आपल्या कंपनीला २०२० पर्यंत १०० कोटी मिळवून देण्याचा टार्गेट ठेवलाय. सध्या ही कंपनी कोट्यवधींची उलाढाल करत आहे.

त्याला या कंपनीची आयडिया त्याच्या वडिलांकडूनच मिळाली. एकदा तिलकला पुस्तकांची खूप गरज होती, मात्र वडील हे खूप थकून घरी आले होते. तसेच त्याचे पुस्तक आणण्यासाठी देखील कोणी तेव्हा उपलब्धही नव्हते. त्यामुळे त्याला इन्स्टंट डीलव्हरीची आयडिया सुचली होती.

त्याने ही आयडिया एका बँकरला सांगितली. त्याला ही आयडिया आवडली. त्याने लगेच आपले काम सोडले आणि तिलकच्या स्टार्टअपसाठी पूढे येत कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी पदवी सांभाळायला सुरुवात केली.

लोकांचे पार्सल त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तिलकने मुंबईच्या डब्यावाल्यांची मदत घेतली. मुंबईतील डब्यावाल्यांची ओळख आणि त्यांचे विशाल नेटवर्कचा फायदा तिलकच्या कंपनीला झाला.

पेपर्स अँड पार्सलस ही कंपनी एका मोबाईल ऍप द्वारे काम करते. सध्या तिलक मेहताच्या कंपनीत २०० कर्मचारी कार्यरत आहे. त्यासोबतच जवळपास ३०० पेक्षा जास्त डब्बेवाले देखील तिलकच्या कंपनीशी जुळलेले आहे.

तिलकची कंपनी दिवसाला १२०० पेक्षा जास्त पार्सल लोकांपर्यंत पोहचवत आहे. यासाठी एका पार्सलमागे ४० ते १८० रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात.सध्या ३ किलो पर्यंतच ही कंपनी पार्सल डिलिव्हरी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.