अमेरीकेच्या तिकीटासाठी घालवला होता वडीलांचा एक वर्षांचा पगार, वाचा सुंदर पिचाई यांचा प्रवास

0

एका व्हर्चुअल ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुंदर पिचाई यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांतील अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की जेव्हा ते पहिल्यांदा अमेरिकेत आले होते तेव्हा त्यांचा अनुभव कसा होता.

मुळचे भारताचे असलेले सुंदर पिचाई यांना आज पुर्ण जगात गुगलचे सिईओ म्हणून ओळखले जाते. त्यांना विद्यार्थ्यांना कधीची हार मानू नका असे सांगितले. यामध्ये अनेक लीडर्स, स्पीकर्स, सेलिब्रिटी आणि युट्यूब क्रिएटर्स उपस्थित होते.

सुंदर पिचाई म्हणाले की टेक्नोलॉजीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे आपल्या हाती निराशा लागते. पण खचून जाऊन चालणार नाही. या टेक्नॉलॉजीद्वारेच तुम्ही काहीतरी नवीन करू शकता.

यातूनच क्रांती घडू शकते. तुम्ही अशा वस्तू बनवू शकता ज्यामुळे पुढच्या पिढीला त्याचा खुप फायदा होणार आहे. या सेरेमनीमध्ये त्यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामासुद्धा उपस्थित होते.

तसेच सिंगर लेडी गागा आणि नोबेल पुरस्कार विजेते मलाला युसुफजईसुद्धा उपस्थित होते. सुंदर पिचाई यांनी आपले काही किस्से सांगताना सांगितले की, जेव्हा ते २७ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी भारत सोडले होते आणि अमेरिकेतल्या स्टैनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये ते शिकण्यासाठी आले होते.

माझ्या वडीलांना त्यांची एक वर्षांची कमाई माझे अमेरिकेचे तिकीट काढण्यासाठी मला दिली होती. मला विदेशात शिकता यावे यासाठी त्यांनी हे सगळं केलं होतं. विमानात प्रवास करण्याचा माझा पहिला अनुभव होता.

त्यांनी सांगितले की जेव्हा मी पहिल्यांदा कॅलिफोर्नियामध्ये आलो तेव्हा तिथे तशी परिस्थिती नव्हती जसा त्यांनी विचार केला होता. त्यांनी सांगितले की, अमेरिका खुप महागडा देश आहे. जर तुम्हाला भारतात फोन लावायचा असेल तर एकावेळी २ डॉलर खर्च करावे लागायचे.

तेथील एका बॅगेची किंमत माझ्या वडीलांच्या एका महिन्याच्या पगाराएवढी होती. ते म्हणाले की त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांचे जीवन इतके बदलून जाईल. सुंदर म्हणाले की माझे नशीब मला या ठिकाणी घेऊन आले होते.

मला टेक्नॉलोजीचे खुप वेड होते. दरम्यान, सुंदर पिचाई तमिळनाडूमधील चेन्नई येथे लहानासे मोठे झाले आहेत. त्यांनी भारती प्रोद्यौगिक संस्थान म्हणजे आईआईटी येथे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीतून मास्टर्स केले आणि त्यानंतर व्हॉर्टन स्कूलमधून एमबीए केले आहे.

वर्ष २००४ मध्ये मध्ये त्यांना गूगलमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यावेळी ते गुगल टुलबार आणि गुगल क्रोमच्या लीड डेव्हलपमेंट टीममध्ये काम करत होते. आता सध्या गुगल क्रोम जगातील सगळ्यात मोठे वेब ब्राऊझर आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.