सुदीप दत्त: १५ रुपयांवर काम करणारा हा माणूस कसा झाला १६०० कोटींच्या कंपनीचा मालक…

0

 

अनेकदा आपली परिस्थिती आपल्याला हवी तशी नसते, बऱ्याचवेळा आपल्या तडजोड करून आयुष्य जगावे लागते. अशात जर आपला आत्मविश्वास आणि परिस्थिती बदलण्याची जिद्द आपल्याकडे असेल तर नक्कीच आपल्या यशाला गवसणी घालता येते.

आजची ही स्टोरी एका अशाच माणसाची आहे, ज्याने आपल्या परिस्थितीवर मात करत यश मिळवले आहे. एकेकाळी १५ रुपयांची नोकरी करणारा हा माणूस आज १६०० कोटींच्या कंपनीचा मालक आहे. सुदीप दत्त असे या माणसाचे नाव आहे.

१९७२ मध्ये पश्चिम बंगालच्या दुर्गापूर या छोट्या गावात सुदीप यांचा जन्म होता. त्यांचे वडिल इंडियन आर्मीमध्ये कामाला होते पण १९७१ मध्ये झालेल्या युद्धात त्यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे त्यांचा पाय अपंग झाला होता. यामुळे सर्व जबाबदारी सुदीप यांच्या मोठ्या भावावर आली होती.

काही दिवसातच त्यांच्या मोठ्या भावाचे स्वास्थ्य बिघडले. पण त्यांच्या उपचारासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. त्यामुळे उपचार न मिळाल्यामुळे त्यांचे पण निधन झाले. आपल्या मुलाच्या मृत्युच्या बातमीने वडिलांना मोठा धक्का बसला आणि काही दिवसातच त्यांचे पण निधन झाले.

त्यामुळे वयाच्या १७ व्या वर्षी कुटुंबाला सांभाळण्याची पुर्ण जबाबदारी सुदीप यांच्यावर आली. आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी सुदीप यांनी आपले शिक्षण सोडले आणि मजुरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुसऱ्यांच्या हॉटलमध्ये चहा बनवण्याचे काम पण त्यांनी केले.

त्यांना आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची होती, त्यासाठी त्यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. १९८८ त्यांनी मुंबईला आल्यावर काम बघण्यास सुरुवात केली. त्यांना तेव्हा रोजचे १५ रुपये मिळणारे काम भेटले.

तीन वर्षे त्यांनी हे काम केले, १९९१ कंपनीच्या मालकाला या कंपनीमुळे मोठे नुकसान झाले होते. नुकसानामुळे त्यांनी हि कंपनी विकण्याचा निर्णय घेतला. हाच सुदीप यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार होता. जेव्हा कंपनी विकण्याची गोष्ट सुदीप यांना कळाली तर त्यांनी हि कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला.

आज पर्यंत केलेली बचत आणि नातेवाईंकाकडून घेतलेले पैसे असे सर्व मिळुन १६ हजार रुपये त्यांनी जमा केले. ते सर्व पैसे घेऊन सुदीप कंपनीच्या मालकाकडे कंपनी विकत घेण्यासाठी गेले.

हि कंपनी मोठी होती, त्यामुळे फक्त १६ हजार रुपयांमध्ये ती येणार नव्हती. मात्र कंपनीला मोठे नुकसान झाल्यामुळे त्यांनी १६ हजार रुपयांमध्ये सुदीप यांना ती कंपनी विकुन टाकली. पण एक अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली की, पुढील दोन वर्षात कंपनीला जो फायदा होईल तो कंपनीच्या मालकाला द्यावा लागेल, सुदीप यांनी हि अट मान्य केली.

त्यांनी या कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी खुप मेहनत घेतली. त्यांनी वेगवेगळ्या प्रॉजेक्टवर काम केले तसेच बाजारातील इतर कंपन्यांपेक्षा त्यांच्या कंपनीची पॅकिंग कशी चांगली आहे, हे त्यांनी पटवून दिले.

त्यांना चांगलाच फायदा होऊ लागला, इतकेच नाही तर सन फार्मा आणि नेस्टलेसारख्या मोठ्या कंपन्यांकडून त्यांना ऑर्डर मिळू लागल्या. तेव्हापासुन त्यांनी कधीच मागे वळून नाही पाहिले.

आज सुदीप यांची ESS DEE ALUMINIUM PVT LTE हि कंपनी भारतातील पॅकेजिंग फिल्डमधील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. या कंपनीची मार्केट व्हॅल्यु १६०० कोटींपेक्षा जास्त आहे. परिस्थिती कशीही असो जर तुमच्याच ती बदलण्याची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही ती बदलु शकतात, याचे उत्तम उदाहरण सुदीप दत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.