एलआयसी एजंट म्हणून सुरुवात करणाऱ्या ‘या’ माणसाची कंपनी आज १२० देशात करते ट्रॅक्टर निर्यात

0

 

आयुष्यात जिद्द आणि मेहनतीने कोणहीती गोष्ट मिळवता येऊ शकते, जर तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही तुमचे ध्येय नक्की गाठू शकतात, असे अनेक लोकांनी सिद्ध करून दाखवले आहे.

आजची गोष्ट सुद्धा अशाच एका माणसाची आहे, ज्याने सुरुवात तर एलआयसी एजंट म्हणून केली होती, पण आज तोच माणूस ७७०० करोडचा मालक बनला आहे. या माणसाचे नाव लक्ष्मणदास मित्तल असे आहे.

सोनालिका ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन लक्ष्मणदास मित्तल सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये १६४ व्या क्रमांकावर आहे. मित्तल यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे.

१९५५ मध्ये मित्तल यांनी आपली सुरुवात एक एलआयसी एजंट म्हणून केली होती. त्यानंतर ते फिल्ड ऑफिसर झाले. त्यावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, त्यावेळी आर्थिक संकटे सुद्धा येत होते, पण त्यांनी हार मानली नाही.

नोकरी सोबतच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात शेती संबंधित मशीन बनवण्यापासून केली. १९९० मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली.

१९९५ मध्ये त्यांनी पुन्हा ट्रॅक्टर बनवण्याचे काम सुरू केले. तीच कंपनी पुढे जाऊन सोनालिका बनली. आज सुद्धा शेतकऱ्यांचा सोनालिका ट्रॅक्टरवर विश्वास आहे. त्यांचे ट्रॅक्टर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये या राज्यात मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात.

सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर फक्त देशातच विकले जातात नाही तर ते ट्रॅक्टर जगातल्या १२० देशात निर्यात केले जातात. ही कंपनी वर्षभरात ३ लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर तयार करते. मित्तल यांनी सोनालिका कंपनीची सुरुवात त्यांच्या तीन मुलांसोबत मिळून केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.