वडील वारल्यानंतर खिशात ५० रूपये घेऊन घर सोडले, आज सौदी अरेबियातील श्रीमंत व्यक्तींमध्ये नाव

0

जर काही करण्याची इच्छा असेल तर असे कोणतेही स्वप्न नाही जे तुम्ही पुर्ण करू शकत नाही. कठोर परिश्रम केल्यानंतर काहीही अशक्य नाही. अशीच एक गोष्ट शोभा लिमिटेडचे अध्यक्ष पीएनसी मेनन यांचीही आहे.

फोर्ब्स मासिकाने अरबमध्ये राहणाऱ्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. त्यांच्याकडे एकूण १४४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १० हजार कोटी रुपये) ची संपत्ती आहे. चला, त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ या.

जेव्हा त्यांनी आपले घर सोडले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ५० रूपये होते. पीएनसी मेनन, देशातील सर्वात मोठी रिअल्टी कंपनी शोभा लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म केरळच्या पालघाट येथे झाला होता.

त्यांचे वडील एक शेतकरी होते आणि वडिलांच्या मृत्यूनंतर ते घराबाहेर पडले तेव्हा त्याच्या खिशात ५० रुपये होते. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांचे शिक्षणही मधूनच सुटले होते. मेनन दहा वर्षांचे होते तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले.

यानंतर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यास कोणीच नव्हते, कारण मेनन यांचे आजोबा अशिक्षित होते. त्यांची आईही बहुधा आजारी असायची. हेच कारण आहे की त्यांना शालेय शिक्षण पुर्ण करतानाच खुप अडचणींचा सामना करावा लागला होता.

जरी प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी अधिक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हाती यश आले नाही. फोर्ब्स मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे की त्यांनी दोनदा बी-कॉम अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश मिळू शकले नाही.

ब्रुनेईच्या सुलतानाचा राजवाडा त्यांनीच डिझाइन केला आहे. मेनन यांनी पहिल्या प्रोजेक्टमध्ये ब्रुनेईच्या सुलतानच्या घराची रचना केली. इन्फोसिस कॅम्पससाठी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती हे देखील बंगळुरू कॅम्पससाठी मेनन यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतले होते.

याशिवाय मेनन यांनी युएईमध्ये बर्‍याच मोठ्या इमारतींची रचनादेखील केली आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की त्यांच्याकडे इंटिरियर डिझायनरसारखी कोणतीही डिग्री नाही. आज तेथे 10 हजार कोटींचे मालक आहेत.

सुरुवातीच्या अडचणीनंतर हळूहळू त्यांनी ओमानसह सर्व अरब देशांमध्ये आपला व्यवसाय पसरवायला सुरुवात केली. ओमान व्यतिरिक्त मेनन यांनी भारतातही व्यवसाय सुरू केला आणि तिथे त्यांनी शोभा लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली.

भारतात ही कंपनी १२ राज्यात कार्यरत असून त्यांची एकूण संपत्ती १० हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे जर इच्छा असेल तर मार्ग दिसतो हे म्हणणे चुकीचे नाही. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. तुम्हाला हा त्यांचा प्रवास कसा वाटला आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.