४० लोकांनी सुरू केलेली सॅमसंग कंपनी आधी किराणा विकायची, आता मार्केट व्हॅल्यू आहे २ लाख कोटी

0

सॅमसंगचे नाव ऐकताच केवळ मोबाइल, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आपल्या मनात येतील. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा तयार करण्यात सॅमसंगनेही मदत केली आहे.

इतकेच नाही तर सॅमसंग वॉटर बोट्स आणि वॉर फाइटिंग टँकही बनवते. सॅमसंगचे संस्थापक कोण आहेत आणि त्यांनी एवढी मोठी कंपनी कशी सुरू केली हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सॅमसंगचा प्रवास.

गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा सॅमसंगमध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त लोक काम करतात. जर सॅमसंगची इन्कम काढायची झाली तर या कंपनीचे उत्पन्न दक्षिण कोरियाच्या जीडीपीच्या सुमारे १७ टक्क्यांएवढे आहे.

याचा अर्थ असा की सॅमसंगचे नुकसान झाले तर दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था विस्कळीत होऊ शकते. सॅमसंगची स्थापना ली बंग चाल यांनी केली होती. ली यांचा जन्म ९ जानेवारी १९४२ रोजी झाला होता.

त्यांनी अर्थशास्त्र मध्ये पदवी आणि एमबीए केले होते. ली यांच्या परिवारात पत्नी रॉ ही हाँग, मोठी मुलगी ली बॉन जिन (हॉटेल चेन शिल्ला आणि थीम पार्क सॅमसंग ओव्हरलॅड अध्यक्ष) लहान मुलगी ली सीओ हून (उपाध्यक्ष चिली इंडस्ट्रीज) एवढे लोक आहेत.

१९३८ मध्ये स्थापन झालेली सॅमसंग ही कंपनी दक्षिण कोरीयाची आहे. ज्यामध्ये सुरूवातीला केवळ ४० लोकांनी काम केले होते. त्यावेळी सॅमसंग ड्राय फिश, किराणा आणि नूडल्सचा व्यवसाय करत असे. यानंतर, सॅमसंगने आपला इन्शुरन्स, सिक्युरीटी आणि रिटेल क्षेत्रात प्रवेश केला.

१९३८ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सॅमसंगची दक्षिण कोरियाची कंपनी आहे. ज्यामध्ये केवळ ४० लोकांनी काम केले. त्यावेळी सॅमसंग कोरड्या मासे, किराणा आणि नूडल्सचा व्यवसाय करत असे. यानंतर सॅमसंगने आपला विमा, सुरक्षा आणि किरकोळ क्षेत्रात प्रवेश केला.

१९८३ मध्ये कंपनीने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला आणि पहिला बिल्ड इन कार फोन तयार केला होता. पण हे प्रोडक्ट हिट झाले नाही. या उत्पादनाच्या अपयशानंतर कंपनीने १९९३ मध्ये SH-700 फोन बाजारात आणला ज्याला लोकांना बर्‍यापैकी पसंती दर्शवली होती.

त्यावेळी महत्वाची गोष्ट अशी होती की ज्या फोनमध्ये काही कमतरता आढळली की ते फोन कर्मचाऱ्यांच्या समोरच जाळले जायचे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना कळाले की आपण आपले नीट केले पाहिजे नाहीतर आपली नोकरी जाईल.

येथे कोणत्याही प्रकारची चुक सहन केली जाणार नाही. यानंतर सॅमसंगने सीडीएमए सेवा आणली आणि सॅमसंगचा मोबाईल भारतात आला. यानंतर, सॅमसंग कंपनीने बरेच पैसे कमविले आणि मोबाइल फोनच्या बाजारात एक विशेष स्थान मिळविले.

आज सॅमसंग जगातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी आयटी कंपनी आहे. आज सॅमसंगचे नाव खुप मोठे बनले आहे. सॅमसंग जगातील सगळ्यात मोठी मोबाईल उत्पादन करणारी कंपनी आहे. उत्तर कोरीयामध्ये या कंपनीच्या नावाचा खुप बोलबाला आहे.

या कंपनीत सध्या ३ लाखाहून अधिक लोक काम करतात आणि त्यांना रोजगार मिळाला आहे. सॅमसंगची मार्केट व्हॅल्यू सुमारे २.२ लाख कोटी आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका

Leave A Reply

Your email address will not be published.