पोट भरायला पैसे नव्हते म्हणून भिक्षा मागणारा हा माणूस आज कमवतोय करोडो रुपये..

0

 

 

माणसाच्या अंगात जर कष्ट घेण्याची ताकद असेल आणि त्याला जर चिकाटीच्या जोड असेल, तर परिस्थिती कितीही गरिबीची असो तो माणूस एक दिवस नक्कीच त्याची परिस्थिती बदलू शकतो.

आजची ही गोष्ट एका अशाच माणसाची आहे, जो एकेकाळी रस्त्यावर भीक मागत होता पण आज तो ५० कोटींच्या कंपनीचा मालक बनला आहे. रेणुका आराध्य असे या माणसाचे नाव आहे.

बंगळुरूमध्ये राहणारे रेणुका हे आज ५० कोटींच्या कंपनीचे मालक आहे. ते एका प्रवासी कॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहे. आज त्यांच्या आयुष्यात अनेक सुखसुविधा आहे आहेत, मात्र एकेकाळी त्याच्या आयुष्यात खूप संकटं होती.

रेणुका यांचा जन्म बंगळुरूच्या गोपसंद्र या गावात झाला होता. त्याचे वडील एका मंदिराचे पुजारी म्हणून काम करत होते. पुजारी असल्याने त्यांना फक्त मंदिराची सेवा करावी लागत होती, या कामासाठी त्यांना कुठलेही मानधन दिले जात नव्हते.

त्यांच्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना तिथल्या गावात भिक्षा मागावी लागायची. त्यांच्या या कामात रेणुका देखील त्यांची मदत करायचे. याच भिक्षेवर त्यांचे पूर्ण कुटुंब जगत होते.

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. पुढे रेणुका आणि त्यांच्या वडिलांना एका वृद्धाची सेवा करण्याचे काम देण्यात आले. जवळपास एक वर्षे त्यांनी हे काम केले.

रेणुका यांना एक वर्षानंतर रेणुका यांना एका आश्रमात टाकण्यात आले होते. तिथे त्यांना दोन वेळचे चांगले जेवण मिळत होते. इथे राहून त्यांना काहीतरी वेगळं करण्याची जिद्द निर्माण झाली आणि आपण आपली परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्यांनी ठरवले.

अशात वडिलांचे निधन झाले त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच आली होती. तेव्हा रेणुका यांनी शिक्षण सोडून एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तीन वर्षे त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले.

त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे अनुभव घेतले तेव्हा त्यांनी स्वता:चा व्यवयास सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुटकेस, वॅनिटी बॅग बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. पण काही काळातच रेणुका यांनी सुरु केलेला हा उद्योग बंद पडला.

हा उद्योग बंद पडल्याने रेणुका यांना मोठे नुकसान झाले. त्यांनी या व्यवसायात गुंतवलेले सर्व पैसे बुडाले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांनी ड्रायव्हर बनण्याचा निर्णय घेतला, त्यांनी आपली अंगठी विकून ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेतले.

त्यांच्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी काही पैसे कमवले आणि २००१ मध्ये त्यांनी सिटी सफारी म्हणून कंपनी सुरू झाली होती.

पुढे त्यांनी कर्ज काढून इंडिका गाडी खरेदी केली. दीड वर्षाच्या आत त्यांनी दुसरी गाडी खरेदी केली. गाड्यांची खरेदी हळूहळू त्यांनी वाढवली आणि इंडियन सिटी टॅक्सी नावाची कंपनी सुरू केली. हीच कंपनी पुढे प्रवासी कॅब ट्रॅव्हल कंपनी म्हणून नावारुपाला आली.

त्यांच्या गाड्यांची संख्या ४ वरून आता ३०० झाली. रेणुका आराध्य यांच्या कंपनीत १ हजार पेक्षा जास्त लोक काम करत आहे. त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल पण ५० कोटींपेक्षा जास्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.