आईकडून कर्ज घेऊन दोन भावांनी सुरू केले पिझ्झा हट, भाड्याच्या घरातून सुरू केला होता व्यवसाय

0

कधी कधी नोकरी करायला कंटाळा येतो. आपल्याला जे आवडते ते करायला आपल्याला आवडत असते पण नोकरीमुळे ते आपल्याला करता येत नाही. घरातून ऑफिसमध्ये आणि ऑफिसमधून घरी असाच आपला दिनक्रम झालेला असतो. याच्यातच आपला कोठेतरी जीव अडकलेला असतो.

अशा परिस्थितीत, उर्वरित वेळ सोशल मिडीयावर घालवताना आपल्याला अनेक यशोगाथा पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत आपल्या मनात काही निराशा असते तसेच काहीतरी मोठे करण्याचा विचारही मनात येतो. हा विचार आपल्या मनात येतो आणि इतिहास घडतो. पिझ्झा हट सुरू करणार्‍या दोन भावांची अशीच एक कथा आहे. ज्यांना नोकरी करायला काहीच हरकत नव्हती.

त्यांची एकच ईच्छा होती की त्यांना स्वताच्या मर्जीचे मालक बनायचे होते. ज्या आवडीने तुम्ही पिझ्झा खाता त्या पिझ्झाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डॅन आणि फ्रँक कार्नी असे त्या दोन भावांचे नाव होते. ज्यांना कधीही नोकरी करायला आवडत नव्हती त्यांना अशी नोकरी हवी होती जिथे सगळं त्यांच्या मर्जीने व्हायला पाहिजे.

आता अशी कोणतीही नोकरी मिळवणे साहजिकच अवघड होते. दोघांनी चर्चा केली आणि जेव्हा काही चांगले झाले नाही तेव्हा त्यांनी त्यांचा मित्र जॉन बेंडरचा सल्ला घेतला आणि बेंडरने त्यांना पिझ्झा पार्लर सुरू करण्याचा सल्ला दिला. दोघांनी पिझ्झा पार्लर चालु करण्यासाठी त्यांच्या आईकडून ६०० डॉलर्स म्हणजे ४० हजारांचे कर्ज घेतले.

१९५८ मध्ये विशिटा, कंसांसमध्ये पिझ्झा हटची स्थापना झाली. त्याचा मित्र बेंडरही त्याच्याबरोबर होता. तिघांनी ५०३ साऊथ ब्लफ येथे एक छोटेसे घर भाड्याने घेतले आणि पिझ्झा बनविण्यासाठी पहिले सेकंड हँड मॉड्यूलर खरेदी केले आणि ‘पिझ्झा हट’ रेस्टॉरंट उघडले. ज्या रात्री रेस्टॉरंट उघडले तेव्हा त्यांनी फ्रीमध्ये पिझ्झा वाटले होते.

त्यांनी ‘पिझ्झा हट’ हे नाव निवडले कारण त्याने खरेदी केलेल्या लोगोमध्ये केवळ नऊ अक्षरांचीच जागा होती. १९५९ मध्ये पहिले पिझ्झा हट सुरू झाल्यानंतर त्यांच्या ठिकठिकाणी अनेक फ्रेचांयझी आणि रेस्टॉरट्स सुरू झाले. कार्ने बंधूंनी आर्किटेक्ट, रिचर्ड डी. बर्क यांच्याकडे संपर्क साधला ज्यांनी त्यांच्यासाठी एक खास प्रकारचे छत तयार केले होते.

अशा प्रकारे पिझ्झा हटच्या रेस्टॉरंटची नवीन ओळख निर्माण झाली. १९६४ पर्यंत, फ्रँचायझीच्या अंतर्गत कंपनीच्या ऑनरशिप स्टोअरसाठी विशेष प्रकारच्या इमारतीचे डिझाइन आणि लेआउट तयार केले गेले होते ज्यामुळे त्यांची जगभरात ओळख निर्माण झाली होती. आता इमारतीची रचना पाहिल्यानंतर ग्राहकांनी हे पिझ्झा हट आहे हे ओळखण्यास सुरवात केली.

१९७२ पर्यंत, पिझ्झा हटने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये देशातील १४ स्टोअरसह स्टॉक टिकर चिन्ह म्हणून नोंदणी केली होती. १९७८ मध्ये पेप्सीकोने पिझ्झा हट खरेदी केले. नंतर पेप्सीकोने केएफसी आणि टॅको बेल देखील विकत घेतले. १९९७ मध्ये तीन रेस्टोरेंट चेन ट्राइकॉनमध्ये आले आणि तीन रेस्टॉरंटच्या कंपन्या एकत्र आल्या.

६ हजार डॉलर्समध्ये दोन भावांनी कंपनी स्थापन केली होती आज येथे ३० हजार कर्मचारी काम करतात. त्यामुळे तरूणांनो असं कधीच समजू नका की आकाशात दगड फेकल्यावर त्याला छिद्र होत नाही म्हणून काय झालं आपण दगड तरी फेकू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा ऑफिसमध्ये काम करायचा कंटाळा येईल तेव्हा नैराश्यावर मात करण्यासाठी या दोन भावांची स्टोरी नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.
[5:42 pm, 17/04/2021] Onkar Jadhav: आपल्या आठ बहिणभावांसह झोपडपट्टीत राहायचे गौतम अदानी, आज आहेत अब्जाधीश

एकेकाळी एकवेळची भाकरीसुद्धा मिळत नव्हती, आज आहे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये नाव

गौतम अदानी: ८ बहिण भावांसह चाळीत राहणारा मुलगा कसा बनला भारतातील सर्वात मोठा उद्योजक?

असे म्हटले जाते की वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, आज एखादा माणूस जर खुप हालाखीचे जीवन जगत असेल तर त्याचे जीवन कधी पालटेल सांगता येत नाही. आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत ज्यांच्यावर ही गोष्ट उत्तम प्रकारे बसते. अशा लोकांच्या यादीमध्ये देशातील यशस्वी उद्योजक गौतम अदानी यांचेसुद्धा नाव आहे.

आज त्यांचा व्यवसाय त्यांचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. कोळसा व्यापार, खाण, तेल आणि गॅस वितरण, बंदरे, लॉजिस्टिक, वीजनिर्मिती-प्रसार असा खुप मोठा विस्तारलेला त्यांचा बिझनेस आहे. पण एक काळ असा होता की त्यांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळत नव्हते. त्यांना त्यासाठी खुप कष्ट करावे लागत होते.

भारतातील काही निवडक अब्जाधिशांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांचा जन्म अहमदाबादच्या गुजराती जैन कुटुंबात २४ जून १९६२ रोजी झाला होता. गौतम अदानी हे त्यांच्या ८ भावंडासोबत राहायचे. त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की कोणीही म्हणणार नाही हा माणूस पुढे जाऊन इतकी प्रगती करेल.

१९८० च्या दशकात, अदानी त्यांच्या अहमदाबाद शहरातील बालपणातील साथीदार मलय महादेवीसोबत त्याच्या स्कुटरवर हिंडायचे. त्यांचे वडील आणि ते एका चाळीत राहात होते. गौतम अदानी यांनी प्राथमिक शिक्षण अहमदाबादच्या सीएन विद्यालयात केले. त्यांनी पदवीसाठी गुजरात विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला, पण तो अभ्यास ते पुर्ण करू शकले नाही. महाविद्यालयीन काळात त्यांना असे वाटत होते की अभ्यास आपल्याला जमणारच नाही.

ग्रॅज्युएशनच्या दुसर्‍या वर्षांत जेव्हा त्यांनी कॉलेज सोडून दिले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. खिशात अवघ्या १०० रुपये घेऊन अदानी स्वप्नांच्या शहरात म्हणजे मुंबईत पोहोचले. येथे, त्यांना महिंद्र ब्रदर्सच्या मुंबई शाखेत पहिली नोकरी मिळाली होती. येथे ते हिरे वेगळे करण्याचे काम करत असत.

व्यवसाय शिकत असताना, अदानी देखील त्यांच्या डोक्यात एक रणनिती आखत होते. मुंबईतील सर्वात मोठी दागिन्यांची बाजारपेठ झवेरी बाजारात अदानी यांनी हिरा दलाली सुरू केली. आपल्या मेहनतीने अदानी यांनी आपले भविष्य घडवले.

अशा वेळी जेव्हा त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणींसह झगडत होते, तेव्हा त्यांनी महाविद्यालय सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वत: चा मार्ग निवडला. त्यांचे वडील शांतीलाल अदानी त्यांच्या या निर्णयामुळे अजिबात खूष नव्हते. पण अदाणी यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही त्यांनी आपल्या मनासारखे करायचे ठरवले होते.

अदानी यांनी स्वतःच्या दमावर अदानी पॉवर लिमिटेड कंपनी सुरू केली. त्यांच्या यशाचा अंदाज लावला जाऊ शकतो की फोर्ब्सच्या पहिल्या १० भारतीयांमध्ये त्यांचा समावेश होता. २०१९ च्या आकडेवारीनुसार, त्यांची मालमत्ता १,१०० करोड युएस डॉलर्स आहे.

१९८८ मध्ये अदानी समूहाची स्थापना झाली. सुरुवातीच्या वर्षात, गटाचे लक्ष ऍग्रो कमोडिटी आणि पॉवरवर होते. १९९१ पर्यंत कंपनी दोन्ही व्यवसायात अधिक चांगली कामगिरी करत होती परंतु इतर व्यवसायात येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे अदानींना जाणवले.

मग त्यांनी अनेक व्यवसायात आपला पाया रोवला. त्यांनी अनेक व्यवसाय उभे केले. आज ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमंधील एक व्यक्ती आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.