एकेकाळी फुगे विकायचा MRF कंपनीचा मालक, आज आहे भारतातील सगळ्यात मोठी टायर बनवणारी कंपनी

0

आज आम्ही तुम्हाला एक टायर बनवणाऱ्या कंपनीबद्दल सांगणार आहोत जिचे नाव आहे एमआरएफ. या कंपनीचे पुर्ण नाव आहे तुम्हाला माहिती आहे का? एमआरएफ कंपनीचे पुर्ण नाव आहे मद्रास रबर फॅक्टरी.

स्वातंत्र्यापुर्वी या कंपनीची स्थापना झाली होती. १९४६ साली एमआरएफची सुरूवात फुगे बनवणारी कंपनी म्हणून झाली होती. या कंपनीची स्थापना केएम मेमन मपिल्लई यांनी केली होती. सध्या ही कंपनी खुप चर्चेत आहे.

कारण पहिल्यांदाच या कंपनीचा शेअर १ लाख रूपयांच्या वरती पोहोचला आहे. सध्या या कंपनीचा शेअर सगळ्यात महाग शेअर आहे. केएम यांचे वडिल एक उद्योजक होते पण त्यांनी खुप कठिण परिस्थितीत या कंपनीची स्थापना केली होती.

असे म्हणतात की, त्रावणकोरच्या राजाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याने त्यांच्या वडिलांची सगळी संपत्ती जप्त केली होती. त्यामुळे त्यांचे सगळे व्यवसाय ठप्प झाले होते. असे असूनही त्यांनी हार मानली नाही.

म्हणून त्यांनी फुग्यांची कंपनी सुरू केली. सुरूवातील केएम यांनी स्वता दुकानात जाऊन फुग्यांची विक्री केली होती. स्वातंत्र्यानंतर त्यांच्या आयुष्याला नवीन वळण आले. १९५४ मध्ये त्यांनी रबर बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.

यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी १९६२ मध्ये एमआरएफ टायर बनविण्याचे काम सुरू केले. १९६४ मध्ये त्यांनी टायर अमेरिकेत टायर निर्यात करण्यास सुरूवात केली. यानंतर १९७३ मध्ये भारतातील पहिले रेडियल टायर आणले गेले.

२००७ मध्ये या कंपनी पहिल्यांदाच एक अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. ४ वर्षानंतर त्यांच्या व्यवसायात ४ पट वाढ झाली. कंपनीने आज इतकी प्रगती केली आहे की आज ही कंपनी ट्युब, बेल्ट, ट्रेड आणि विमानाच्या टायरांचीही निर्मिती करते.

एमआरएफ एकमेव अशी कंपनी आहे जी सुखोई ३० एमकेआय सिरीजच्या लढाऊ विमानांसाठी टायर तयार करते. जगातील सुमारे ६५ देशांमध्ये त्यांच्या टायरची निर्यात होते. १९९३ मध्ये एमआरएफचा शेअर फक्त ११ रुपयांना होता.

त्यावेळी या शेअरमध्ये १००० रूपयांची गुंतवणूक जर कोणी केली असेल तर त्याला आज ९० शेअर मिळाले असते. ज्याची किंमत आज ९० लाख झाली असती. आता सध्याला हा शेअर ९० हजार रूपयांना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.