६५ व्या वर्षी व्यवसाय सुरू केला, १००९ वेळा अपयश आलं; आता पूर्ण जगाने डोक्यावर घेतलं

0

व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर तुमचं वय किती लागतं? तिशीच्या आत. असे अनेक लोक म्हणतील. कारण नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अंगात जोश हवा असतो, पण जर कोणी  आपल्या साठीत व्यवसाय सुरू करण्याचे म्हंटले तर नक्कीच तुम्हाला ते विचित्र वाटेल.

अशीच एक गोष्ट आहे, कोलोनल सेंडर्स (Colonel Sanders) यांची. कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण केएफसीचे फाऊंडर सेंडर्स हेच आहे. सेंडर्स याची ही कथा एक चित्रपट कथेसारखीच आहे. जसं की एखाद्या नायकाने ठरवलं की ते ठरवलं, मग अडचणी, अपयश कितीही आले, तरी त्याला यश मिळणारच.

साठी उलटल्यावर आपण बघतो, की माणसाची गती हळूहळू मंदावते. मात्र सेंडर्स यांनी आपल्या वयाच्या ६५ व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली आहे, आणि बोलता बोलता सगळ्या चिकन प्रेमींची चिकन खाण्याची पद्धतच बदलून टाकली, ते पण एकट्याच्या जीवावर.

हा नवीन व्यवसाय तुमच्या सगळ्यांचाच ओळखीचा आहे, तो म्हणजे केएफसी. सेंडर्स यांनी हा व्यवसाय वयाच्या ६५ व्या वर्षी सुरू केला आहे. हळूहळू हा व्यवसाय इतका वाढला की   केएफसी सध्या जगातल्या सगळ्यात मोठ्या फूड चेन्स पैकी एक आहे.

सेंडर्स हे लहान असतानाच त्यांचे वडील मरण पावले. १९०६ मध्ये १६ व्या वर्षी त्यांना सेनामध्ये भरती होयचे होते त्यासाठी ते सेनामध्ये आपले खोटे वय सांगून भरती झाले. १९०७ मध्ये सेंडर्स लष्करातून बाहेर पडले. मात्र वयाच्या २० व्या वर्षीच त्यांची पत्नी मुलाबाळांना घेऊन सेंडर्स यांना सोडू गेली.

काही वर्षे त्यांनी उपजीविकेसाठी वेगवेगळे कामे केली. त्यात टायर विकणे, फेरी बोट चालवणे, इंजिन चालवणे, अशी लहानसहान कामे त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत केली. त्यानंतर त्यांना kentucky येथील कॉर्बीन येथे सर्व्हिस स्टेशनवर कुकिंगचे काम मिळाले.

सेंडर्स यांनी बनवलेले पदार्थ तिथल्या लोकांना इतके आवडले की, त्या सर्व्हिस स्टेशनचे रूपांतर एका हॉटेलमध्ये झाले. सेंडर्स हे स्वयंपाक करताना वेगवेगळे प्रयोग करून पहायचे. त्यामुळे त्यांना नवनवीन पाककृती माहीत होत्या. एवढेच काय त्यांनी तर  १९३९ साली त्यांनी चिकनची एक अनोखी पद्धत तयार केली.

६५ व्या वर्षी त्यांनी आपल्या कामावरून निवृत्ती घेतली. सरकारकडून त्यांना १०५ डॉलरचा चेक मिळाला. तेव्हा ते एका झाडाखाली बसून आपली संपत्ती मोजत होते. तेव्हा त्यांच्या कडे  काहीच पैसे नाहीये, असे जाणवले. पण त्यांच्याकडे पाककला होती, त्यामुळे अजून आयुष्य खुप बाकी आहे म्हणून त्यांनी एक नवा व्यवसाय सुरू करायचे ठरवले.

सेंडर्स यांनी आपल्या चेकमधून ८७ डॉलर्स काढले आणि घरोघरी जाऊन फ्राईड चिकन विकू लागले. त्यांनी आपल्या परिसरातील सर्व रेस्टॉरंट पालथे घातले. मात्र त्यांना होकार तिथेच मिळाला नाही. जवळपास १००९ वेळा त्यांना नाकाराचा सामना करावा लागला.

इतके नकार सेंडर्स यांनी पचवले आणि ‘one more time’ म्हणत पुन्हा सुरू केले. शेवटी त्यांना एका हॉटेलचा होकार मिळाला. पेट हार्मन ज्यांचे स्वतःचे हॉटेल होते. त्यांनी सेंडर्स यांच्याशी भागीदार केली आणि चिकनला ‘kentuchy Fried Chicken’  असे नाव दिले.

इथून सेंडर्स यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. १९६४ सालापर्यंत अमेरिकेतील ६०० पेक्षा जास्त हॉटेल्समध्ये केएफसीचे चिकन विकले जाऊ लागले होते.

जेव्हा सेंडर्स यांना लक्षात आले की आता कंपनी जागतिक स्थानावर पोहचली आहे. तेच त्यांनी कंपनीचा मालकी हक्क १९६५ साली दोन मिलियन डॉलरला विकून दिले. मात्र ते कायम केएफसीचे ब्रँड एम्बेसिडर म्हणून राहिले, केएफसीच्या लोगोवरही त्यांचाच चेहरा झळकताना दिसतो. सेंडर्स हे ८८ व्या वर्षी अरबपती झाले होते.

सेंडर्स यांनी कॅनडामधले आपले रेस्टॉरंट हे आपल्या मालकीचेच ठेवले. तसेच आयुष्यभर ७५ हजार डॉलर्स सेंडर्स यांना देण्याचा करारही तेव्हा करण्यात आला होता. साठीनंतर मिळालेले या यशावर कोणालाही लवकर विश्वास बसणार नाही, पण सेंडर्स यांनी ते करून दाखवले.

तुम्हाला वयाच्या कुठल्याही टप्प्यावर वाटत असेल की तुम्ही आयुष्यभर काहीच करू शकले नाही, आता काही जमणार नाही, तर ही सेंडर्स यांची कहाणी तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे. ही कहाणी तुम्हाला नक्कीच एक नवीन ऊर्जा देईल. अपयश हे येत असतात, पण त्यांना पचवायला आपण शिकले पाहिजे, हे सेंडर्स यांनी दाखवून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.