रस्त्यावर कपडे विकणारा मुलगा कसा झाला कॉमेडीचा किंग? वाचा कपिल शर्माचा थक्क करणारा प्रवास

0

आज आम्ही कपिल शर्माचा थक्क करणारा प्रवास सांगणार आहोत. आज कपिल भारतातच नाही तर पुर्ण जगात लोकप्रिय आहे. आपल्या विनोदाच्या जोरावर त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याचा द कपिल शर्मा शो जगप्रसिद्ध आहे. सगळ्यात जास्त टीआरपी असलेला आज कपिल शर्मा शो सगळ्यात मोठा विनोदाचा शो आहे.

कपिल शर्मा हा देशातील सर्वात लोकप्रिय विनोदवीरांपैकी एक आहे. अनेक ठिकाणांहून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असतो. असा कोणताही कलाकार नाही जो त्याच्या शोमध्ये आला नसेल. मोठमोठे कलाकार त्याच्या शोमध्ये येण्यासाठी वाट बघत असतात.

आपल्या अनोख्या अभिनयशैलीतून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माचे आज लाखोंचे फॅन फॉलोविंग आहे. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल एक काळ असा होता की कपिल शर्माला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर कपडे विकावे लागत होते.

आज आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील. कपिल शर्माचा जन्म १९८१ साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडिल पोलिसांत होते. पण जेव्हा कपिल लहान होता तेव्हाच त्याचे वडील त्याला सोडून गेले होते.

त्यांना कर्करोग होता. पुढे असे झाले की पुर्ण कुटुंबाची जबाबदारी कपिलवर आली. त्यानंतर कपिलने मिळेल ते काम करत असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यास सुरूवात केली. सुरूवातीला त्याने एका पीसीओ बुथवर काम करण्यास सुरूवात केली.

तिथंच त्याने कपड्यांचा एक ठेलासुद्धा सुरू केला होता. त्यावेळी तो त्या दुकानावर बॉलिवूड कलाकारांची मिमिक्री करायचा. असे करून तो ग्राहकांना आपल्या दुकानावर आकर्षित करत असे. असे करून तो आपले लहानसे कपड्यांचे दुकान चालवत असे. त्यानंतर एक असा काळ आला की त्याचे नशीब उजळले.

त्याने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये भाग घेतला. त्यानंतर २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या शोमध्ये त्याने बाजी मारली आणि तो या शोचा विजेता ठरला. तेथून खऱ्या अर्थाने कपिलच्या करिअरला सुरूवात झाली असे म्हणता येईल.

त्यानंतर सोनी या वाहिनीने त्याला कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये होस्ट करण्याची संधी दिली. कपिलच्या अनोख्या कॉमेडीमुळे हा शो खुप सुपरहिट झाला. त्यानंतर कपिल सुपरस्टार झाला. त्यानंतर त्याला काही बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

दरम्यान हा प्रवास त्याच्यासाठी खुप कठीण होता. त्याला खुप संकटांचा सामना करावा लागला आहे. तुम्हाला जर माहित असेल तर एकदा त्याच्या द कपिल शर्मा शोच्या सेटला आग लागली होती आणि पुर्ण सेट जळून खाक झाला होता. त्यामुळे अनेक दिवस हा शो बंद होता.

पण कपिलने पुन्हा नव्या उमेदीने हा शो पुन्हा सुरू केला. त्याने पुन्हा आपल्या अनोख्या कॉमेडीच्या जोरावर शो ला हिट केले. पण याच्यामध्ये त्याच्या साथिदारांचा खुप मोठा हात आहे. त्याचे साथिदारही त्याच्यासारखेच खुप मोठे कॉमेडीचे स्टार आहेत.

त्यामध्ये सुनिल ग्रोवर तर तुम्हाला माहितच असेल किंवा भारती सिंग. यांनी कपिलला त्याचा शो हिट करण्यासाठी खुप मदत केली आहे. तर असा बनला एक साधारण कपडे विकणारा मुलगा कॉमेडीचा बादशाह. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवयला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.