२ लाख रूपये कर्ज घेऊन सुरू केला होता वडापावचा बिझनेस, आता कमावतोय १०० कोटी

0

महाराष्ट्राचा बर्गर म्हणजे वडापाव. अगदी सामान्य व्यक्तीला परवडणारा आणि सगळ्यांचे पोट भरणारा वडापाव महाराष्ट्रातच काय तर पुर्ण जगात लोकप्रिय आहे. १० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत वडापाव आपल्याला पाहायला मिळेल.

जर तुम्ही मुंबईला गेलात आणि तिथे जाऊन वडापाव खाल्ला नाही तर तुमची मुंबईची वारी फेल ठरली असं समजा. याच वडापावची लोकप्रियता एका माणसाने ओळखली आणि १०० चौरस फुटात जम्बोकिंग वडापावचे दुकान सुरू केले होते.

आज हा व्यक्ती यातून १०० कोटी रूपये कमवत आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे धीरज गुप्ता. धीरज गुप्ता यांचा जम्बोकिंग वडापाव पुर्ण महाराष्ट्रात खुप फेमस आहे. साध्या वडापावपेक्षा हा वडापाव २० टक्के मोठा असतो. म्हणून याला जम्बो वडापाव असे म्हटले जाते.

याच्या शाखा तुम्हाला महाराष्ट्रातील अनेक शहरात पाहायला मिळतील. तसेच त्यांच्या सध्या ११४ फ्रेंचायजी आहेत. त्यांचे पुढील लक्ष्य १८० आउटलेट्स आहेत. मार्च २०२२ पर्यंत हे आउटलेट्स चालू करण्याचे त्यांचे धेय आहे.

मॅकडोनाल्डच्या बर्गरला प्रेरित होऊन त्यांच्या डोक्यात ही आयडिया आली होती. जंबोकिंग चालू करण्यासाठी त्यांनी दोन लाख रूपये कर्ज घेतले होते. त्यानंतर मालाड रेल्वे स्थानकाबाहेर त्यांनी ११० चौरस फुटात व्यवसाय सुरू केला होता.

त्यांनी आपला वडापाव बाजारात मिळणाऱ्या वडापावपेक्षा वेगळा कसा बनवता येईल याकडे लक्ष दिले. त्यामुळे त्यांनी वडापावचा आकार आणि चवही बदलली. धीरज गुप्ता यांनी मिठाईचा व्यवसाय करण्याचाही निर्णय घेतला पण त्यांचा हा व्यवसाय चालला नाही.

पण त्यांचा वडापावचा व्यवसाय खुप लोकप्रिय झाला. त्यांचे यश पाहून अनेक जणांनी त्यांची कॉपी मारत जंबो नावाने वडापाव विकण्यास सूरूवात केली. तेव्हा धीरज यांनी फ्रेंचाइजी देण्यास सुरूवात केली आणि आउटलेट्स वाढवले.

आता जंबोकिंगमध्ये शेजवान जंबोकिंग आणि छोले जंबोकिंग हे प्रकार आहेत. त्याव्यतिरिक्त तेथे अनेक चटपटीत वडापाव मिळतात. तसेच आईसक्रिम, मिल्कशेक्स आणि फ्रेंच फ्राईजही तेथे मिळतात.

धीरज यांनी सांगितले की, ग्लोबल क्युएआर जायंट्सच्या बिझनेस मॉडेलचे निरिक्षण करून मी त्याचा वापर केला होता. तसेच पदार्थांची गुणवत्ता कशी टिकवता येईल याकडे लक्ष दिले होते. नंतर त्यांना अनेकक पदार्थ विकण्यास सुरूवात केली.

पर्याय वाढविण्यापेक्षा एकाच पदार्थावर मी लक्ष केंद्रित केले होते. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे व्यवसाय बुडाले. जंबोकिंगनेही पुन्हा जोमाने सुरूवात केली आहे. आता वडापावप्रेमी पुन्हा जंबोकिंगकडे वळू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.