जिद्दीला सलाम! जन्मताच नव्हता जबडा, व्यंगावर मात करून तो बनला मोठा स्टार

0

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या प्रेरणेने अनेक लोक उभे राहतात. आज अशाच एका सुपरस्टारबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याची कहाणी जर तुम्ही वाचली तर तुम्हीही अवाक व्हाल. कारण तो जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला जबडाच नव्हता.

या मुलाचं नाव आहे यशायाह अकोस्टा. त्याचा जन्म अमेरिकेच्या एरिझोनामध्ये ३१ ऑक्टोबर १९९९ साली झाला होता. वेळेच्या आधीच त्याचा जन्म झाला होता. जन्माला आल्यानंतर डॉक्टर त्यांच्या आईवडिलांना म्हणाले होते की त्याची जगण्याची क्षमता खुप कमी आहे.

कारण दोन महिने आधीच त्याचा जन्म झाला होता. पण आज तोच मुलगा मोठा स्टार झाला आहे. डॉक्टरची भविष्यवाणी त्याने खोटी ठरवली आणि त्याला आज अनेक लोक ओळखतात. जॉ लाईन नसलेला म्हणजे जबडा नसलेला हा मुलगा इतका हिट झाला कसा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्याला जो आजार झाला होता त्याला अग्न्याशिया असे म्हणतात. ही फार अवघड स्थिती असते यामध्ये एक किंवा दोन्हीही जबडे नसतात. तुम्हाला वाचून वाईट वाटेल पण त्याला खालचा एकही जबडा नाहीये आणि श्वसनपथही नाहीये.

या कारणामुळे त्याला जेवण करता येत नाही आणि श्वासही घेता येत नाही. त्याच्या गळ्यात एक श्वसननलिका लावण्यात आली आहे ज्याच्याद्वारे तो श्वास घेतो. त्याचा पोटातही एक ट्युब लावण्यात आली आहे ज्याच्याद्वारे त्याला जेवण दिले जाते.

त्याचे बालपण खुप अडचणींनी भरलेले होते पण तरीही त्याच्या आईवडिलांनी त्याची साथ सोडली नाही. श्वास घेण्यासाठी तो ज्या ट्युबचा वापर करतो त्या ट्युबला कमीत कमी दिवसातून तीन वेळा साफ करावी लागते.

दर आठवड्याला ती ट्युब बदलावी लागते. तो पदवीधर आहे आणि त्याने साधारण शाळेत आपले शिक्षण घेतले आहे. तो इतर मुलांसारखा दिसत नव्हता त्यामुळे त्याची अनेकवेळा खिल्ली उडविण्यात आली. २० वर्षांमध्ये त्याच्यावर अनेक सर्जरी झाल्या आहेत.

त्याचा आयुष्यातला बराचसा वेळ हॉस्पिटलमध्ये गेला आहे पण तरीही तो खचला नाही. त्याला कृत्रिम जबडा लावण्याचा पर्याय देण्यात आला पण त्याने यासाठी नकार दिला. त्याचे म्हणणे आहे की, कृत्रिम जबडा लावला तर त्याचा चेहरा ठिक होईल पण त्याला आवाज मिळणार नाही.

तो कसापण दिसुदे तो आनंदी आहे. २०१६ मध्ये त्याने फिनिक्स चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलांच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी त्याने सांगितले की त्याल एक रॅपर बनायचे आहे.

लहाणपणीपासून तो गाणी लिहितो. त्याने अनेक गाणी लिहिली आहेत. २०१७ मध्ये त्याने ऑक्सीजन टू फ्लाय हे गाणं लिहिलं होतं. त्यानंतर हेट इज द वीक हे गाणं त्याने लिहिलं होतं. त्याने गाण्याच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचा हा प्रेरणादायक प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.