गुणाबाईंची यशोगाथा, ५ कोटींचे खेकडे निर्यात करणाऱ्या ‘खेकड्याच्या मावशी’

0

आज आम्ही तुम्हाला गुणाबाईंची यशोगाथा सांगणार आहोत. आपल्या पारंपारिक व्यवसायाला जपत याच व्यवसायाला आज त्यांनी परदेशात पोहोचवले आहे. त्यांनी नवी मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे.

त्यांना आगरी महोत्सवात आगरी गौरव पुरस्कारही मिळाला आहे. नवी मुंबईच्या छोट्याशा खाडीच्या किनाऱ्यावर त्यांनी घाम गाळून चक्क खेकडे परदेशात निर्यात करण्यास सुरूवात केली. गुणाबाई नामदेव सुतार असे त्यांचे नाव आहे.

त्यांचे ६५ वर्षे आहे. मासे पकडल्यानंतर मासळी बाजारात त्या मासे विकायला येतात. रात्री १० वाजता मासे विकून त्या परत घरी जातात. १७ तास त्या आपल्या कामामुळे घराच्या बाहेर असतात. सकाळी घर सोडल्यानंतर सगळी कामे उरकूनच त्या घरी येतात. रात्री घरी आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करून सर्वांना खाऊ घालायचा. घरातील सर्व माणसांची त्या काळजी घेतात. गुणाबाई यांनी आपल्या आयुष्यात खुप कष्ट केले आहेत.

त्यांना व्यवसायातही खुप नुकसान झाले होते. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही आणि खेकडी मासे विकण्याचा व्यवसाय सुरूच ठेवला. पुर्वी गुणाबाईंच्या घराजवळ कालवा होता. मासेमारी करून त्या घर चालवत असत.

मात्र काही दिवसानंतर नागरीकरणाच्या लाटेत हा कालवा बुजविण्यात आला. त्यांची मासेमारी बंद झाली. पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि खाडी किणाऱ्यावर जाऊन खेकडे पकडण्यास सुरूवात केली.

मागणी वाढू लागल्यानंतर त्यांनी बाकीच्या महिलांकडून खेकडे विकत घेण्यास सुरूवात केली. सुरूवातीला काही हॉटेल्स व्यवसायिकांनी त्यांच्याकडून खेकडे विकत घेण्यास सुरूवात केली होती. ही मागणी पुर्ण करण्यासाठी त्यांनी इतर महिलांकडून खेकडे विकत घेण्यास सुरूवात केली.

त्यानंतर चेन्नईमधील काही हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्याकडे खेकडे व माशांची मागणी केली. मग त्यांचा व्यवसाय खुप मोठा झाला. नवी मुंबईच्या खाडीवरून मिळणारी ही खेकडी गुणाबाई सुतार यांच्या कौशल्यामुळे थेट चेन्नईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचली.

विशेष म्हणजे त्यांचे कोणतेही शालेय शिक्षण झालेले नाही. आज त्यांच्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. काही दिवसांनी त्यांना सिंगापूर येथून खेकड्यांची मागणी आली. हे करत असताना त्यांना त्यांच्या मुलाची आणि सुनेची खुप मदत मिळाली.

आता या व्यवसायाचे रुपांतर मोठ्या उद्योगात झाले आहे. यशाच्या उंच शिखरावर पोहोचताना व्यवसाय करण्यासाठी गुणाबाई सुतार यांनी शासकीय परवानग्या घेण्यासाठी खुप सरकारी पायऱ्या झिजवल्या.

पण त्या कधीही डगमगल्या नाहीत. पहिली पर्यंत शिक्षण झाले असूनही निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कायदेशीर बाबी त्यांनी पुर्ण केल्या. दरवर्षी त्या पाच कोटींचे खेकडे निर्यात करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.