गरीब परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले होते, आज आहे देशातील दुसरा श्रीमंत माणूस

0

 

सर्व सामान्य कुटुंबातील मुलं हे नेहमीच मोठमोठी स्वप्न बघत असतात, पण प्रत्येकाचेच स्पप्न पुर्ण होते असे नाही. जी मेहनतीने आपल्या स्पप्नांच्या मागे धाव घेत असतात, त्यांचेच स्वप्न पुर्ण होतात. आजची गोष्ट पण अशाच एका माणसाची आहे, जो एकेकाळी सामान्य कुटुंबातला होता, पण आज तो देशातला दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

आजची गोष्ट आहे गौतम अदानी यांची. देशातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून गौतम अदानीची ओळख आहे. आजजरी ते देशातील दुसरे श्रीमंत व्यक्ती असले तरी त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता.

गौतम अदानी यांचा जन्म गुजरातमध्ये २४ जून १९६२ ला झाला होता. गौतम यांचे वडिल कपड्यांचे व्यापारी होते. असे असले तरी त्यांची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. जेव्हा ते बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षातून शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती आणखी बिघडली त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडले आणि आर्थिक स्थिती सुधारवण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्यांनी वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली, पण त्यात त्यांचे मन लागले नाही. त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते, त्यामुळे ते मुंबईला आले. सुरवातीला त्यांनी डायमंड कंपनीत सॉर्टर्सचे काम सुरु केले होते.

अशात त्यांच्या भावाने प्लास्टिकचे युनिट सुरु केले आणि गौतम यांना पुन्हा गुजरातला बोलावून घेतले. १९८५ गौतम यांनी पॉली फिनाईल युनायटडमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी अदानी एक्सपोर्ट लिमिटेडची स्थापना केली.

गौतम अदानी यांनी मेटल, कपडा, प्लास्टिक यासर्व क्षेत्रात प्रगती केली, इतकीच नाही तर त्यांनी वीज निर्मीतीच्या क्षेत्रात सुद्धा आपला पाय रोवला आहे. तर २००९ मध्ये त्यांनी अब्बोर पॉवर पोर्ट आणि कर्मिकल कोल या दोन्ही कंपन्या विकत घेतल्या होत्या.

अदानी यांनी मारुती ८०० ने आपल्या व्यवसायाच्या प्रवासाला सुरुवात केली होती, पण आज त्यांच्याकडे बीएमडब्लूच्या अनेक गाड्या आहे. तसेच फरारी, तीन हेलिकॉप्टर, तीन बोम्बार्डियर, तसेच बीचक्राफ्ट विमान सुद्धा आहे.

तसे पाहिले तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति मुकेश अंबानी आहे. पण ब्लुमबर्ग बिलियर इंडेक्सनुसार गौतम अदानी यांना यावर्षी व्यवसायात मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त फायदा झाला आहे. अदानी यांना २१ बिलियन डॉलरचा नफा झाला होता तर मुकेश अंबानी १७.६ बिलियन डॉलरचा नफा झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.