एकेकाळी बसने प्रवास करण्यासाठीही पैसै नव्हते, आता आहे ३००० कोटींचा मालक

0

लहान मुलांना आणि मोठ्यांना स्नॅक्स सर्वात जास्त आवडतात. पण जर आम्ही तुम्हाला असं म्हणलं तर स्नॅक्स विकून एखादा व्यक्ती हजारो करोडचा मालक झाला तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. ४८ वर्षीय व्यक्तीने चिप्स व्यवसाय सुरू केला आणि ३००० कोटींची कंपनी सुरू केली.

प्रताप स्नॅक्सचे मालक अमित कुमत यांची ही कहाणी आहे. कुमत यांनी अमेरिकेतून विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. खास गोष्ट म्हणजे आज ही कंपनी लेज चीप्स बनवणाऱ्या कंपनीला तोड देत आहे. आज आपण त्यांची कथा जाणून घेणार आहोत.

जेव्हा ते आपल्या मूळ गावी इंदोरला परत आले तेव्हा त्यांना नोकरी मिळणे फार कठीण झाले. त्यांना हवी तशी नोकरी मिळत नव्हती. मग त्यांनी आपल्या वडिलांच्या कपड्यांच्या व्यवसायात भाग घ्यायला सुरुवात केली.

त्यांचा कपड्यांचा व्यवसाय चांगला सुरू झाला. मग त्यांनी बरेच बिझनेस सुरू केले जसे की SAP ट्रेनिंग देणे आणि केमिकल डायचा बिझनेस, वेबसाइट बनवण्याचा व्यवसाय. १९९९ नंतर त्यांच्यासोबत असे काही घडले की त्यांचे सर्व बिझनेस तोट्यात गेले.

त्यांच्यावर १८ कोटींचे कर्ज होते. हे दिवस होते जेव्हा अमित यांच्याकडे बसमध्ये प्रवास करण्यासाठी पैसेही नव्हते. अपुर्व कुमत हे त्यांचे मोठे भाऊ होते. त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या मित्राच्या स्नॅक्स व्यवसायात १५ लाख रूपये इन्वेस्ट करायला सांगितले.

मग त्यांनी दुसर्‍या कौटुंबिक मित्राला व्यवसायात भागीदार बनविले. तीन लोकांच्या या कंपनीने प्रथम इंदूरमध्ये चिप्स बनवण्याचे युनिट उभे केले. काही ठिकाणी, कंपनीने प्रतिस्पर्धी कंपनी फ्रिटो (जिचे नाव सध्या लेज आहे) ला खुप टक्कर दिली होती.

२००६-७ मध्ये त्यांनी चुलबूले हा नवीन प्रोडक्ट लॉन्च केला. अमित यांची कंपनी यलो डायमंडने कुरकुरेला टक्कर देण्यासाठी चुलबुले लाँच केले. २००९ मध्ये यलो डायमंडची प्रगती पाहून एका जागतिक कंपनीने त्यांच्यामध्ये भागिदारी केली.

यासह, त्यांनी नवीन मशीन्स खरेदी केल्या आणि बटाटा चिप्स आणि नमकीन तयार करण्यास सुरवात केली. यापूर्वी या कंपनीत फक्त तीन लोक काम करत होते. आज तेथे ७५० कर्मचारी पुर्णवेळ काम करतात.

त्याचवेळी सुमारे ३००० लोक अप्रत्यक्षपणे काम करतात. यलो डायमंड आता बांगलादेशात एक प्लांट उघडण्याच्या विचारात आहे. यलो डायमंडनेही आयपीओ आणून भांडवलातून ४८२ कोटी रुपये जमा केले आहेत.

प्रथमच एनएसईवर प्रताप स्नॅक्सची नोंद ३३ टक्के प्रीमियमसह लिस्ट झाली होती. प्रताप स्नॅक्सचे शेअर्स बीएसईवर प्रति शेअर १२७० रुपये होते. यादीतील प्रताप स्नॅक्सची इश्यू किंमत प्रति शेअर ९३८ रुपये निश्चित करण्यात आली.

पुढील दोन वर्षांत त्यांच्या कंपनीची बाजारपेठ ६५०० कोटी होईल असे कुमत यांचे म्हणणे आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.