चेतन सकारिया: एकेकाळी महागडे शुज घेण्यासाठीसुद्धा पैसै नव्हते, आज आहे राजस्थानचा स्टार गोलंदाज

0

राजस्थान रॉयल्सचा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याने आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पंजाबच्या विरोधात तीन बळी घेत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तुम्हाला वाचून दुख वाटेल पण चेतनसाठी हा काळ खुप कठीण होता कारण जानेवारीतच त्याच्या भावाने आत्महत्या केली होती.

जेव्हा त्याच्या भावाने आत्महत्या केली होती चेतन मुश्ताक अली ट्रॉफीसाठी खेळत होता. सकारियाला राजस्थान रॉयल्सने १ करोड २० लाख रूपये देऊन खरेदी केले होते. सुरूवातीला चेतनकडे गोलंदाजी करण्यासाठी महागडे शुज घ्यायलासुद्धा पैसै नव्हते.

एकदा झाले असे की सौराष्ट्रचे सिनिअर खेळाडू शेल्डन जॅकसन याला चेतनने क्लीन बोल्ड केले होते त्यानंतर त्याच्यातील प्रतिभा सगळ्यांना दिसली आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला तेथील कोचने शुज दिले होते. चेतनने २०१८-१९ मध्ये सौराष्ट्रसाठी खेळायला सुरूवात केली होती.

त्याचे करिअर खुप संघर्षांनी भरलेले होते. त्याचे वडील टेम्पो चालवायचे पण त्यांचे काम एकदा बंद पडले. त्यानंतर चेतनकडे क्रिकेटची ट्रेनिंग घेण्यासाठीसुद्धा पैसै नव्हते. चेतनवर नौकरी करायची वेळ आली आणि पुर्ण घराची जबाबदारी त्याच्यावर आली होती.

अशावेळी त्याचे मामा त्याच्या मदतील आले आणि त्यांनी घर सांभाळायला सुरूवात केली व चेतनला सांगितले की तु तुझ्या खेळाकडे लक्ष दे. एकदा त्याला खेळात दुखापत झाली होती तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याला दुसरे काहीतरी करण्यासाठी सांगितले.

त्यानंतर चेतनने काही वर्षे मामाच्या स्टेशनरीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण चेतनला आधी बॅट्समन व्हायचे होते पण ११ वीला असताना त्याने गोलंदाज व्हायचे ठरवले. कारण शाळेत असताना गोलंदाजी करणाऱ्याला जास्त सन्मान दिला जात होता.

त्याने सुरूवातीला टेनिस बॉलपासून खेळायला सुरूवात केली होती. त्याने त्यावेळी कसलीही ट्रेनिंग घेतली नव्हती. मागच्या वर्षी चेतन रॉयल चॅलेजंर्स बॅंगलोरचा नेट बॉलर होता. लयबद्ध पद्धतीने गोलंदाजी करणारा चेतन १३० किलोमीटर वेगाने चेंडू फेकायचा.

आतापर्यंत त्याने प्रथम श्रेणीमध्ये १५ सामने खेळले आहेत. मागच्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये विजेती टीम सौराष्ट्रमध्ये त्याने महत्वाची कामगिरी बजावली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांत त्याने १२ बळी घेतले होते. त्या सामन्यांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ४.९० होता.

सहा वर्षांपुर्वी बिहार ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांत १८ बळी घेतले होते. त्याच्या बहिणीने सांगितले की, ते आधी खुप गरीब होते. त्यांच्या घरात साधा टीव्हीसुद्धा नव्हता. चेतनला लहानपणापासूनच क्रिकेटची खुप आवड होती. तो त्याच्या नातेवाईकांच्या घरामध्ये टीव्हीवर क्रिकेट सामने पाहण्यासाठी जात असे.

त्याच्याकडे स्पाईक्सचे महागडे शुज घेण्यासाठीसुद्धा पैसै नव्हते. आमचे वडिल कांजी भाई हे टेम्पो चालवायचे, असे चेतन सकारियाची बहिण म्हणाली. चेतनने आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी खुप मेहनत घेतली. आज तो राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.