त्याने जगाला हसवले पण स्वताच्या चेहऱ्यामागचे दु:ख मात्र सगळ्यांपासून लपवले, वाचा चार्लीचा जीवनप्रवास

0

चार्ली चॅपलिन हे विनोदी जगातील एक नाव आहे जे सर्वांना माहित आहे. एक वेळ अशी होता की लोकांना हसवण्यासाठी चार्ली चॅपलिन यांचे नावच पुरेसे होते. चार्लीने काहीही न बोलता लाखो लोकांना हसवले आहे. ही अशी व्यक्ती होती जी रडणार्‍यालासुद्धा हसवायची, पण या हसऱ्या चेहऱ्यामागे एक गोष्ट आहे जी कोणालाही रडायला भाग पाडेल.

त्यांचे स्वतःचे आयुष्य अती दुःख आणि दारिद्र्यात गेले. तर आज आपण जाणून घेणार आहोत कीचार्ली चॅपलीन कॉमेडीचा बादशाह कसा बनला. चार्ली चॅपलिन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्याच्या आईचे नाव हॅना चॅपलिन आणि वडिलांचे नाव चार्ल्स स्पेंसर चॅपलिन होते.

चार्ली यांचे वडील संगीत हॉलमध्ये गाणे व अभिनय करायचे. चॅपलिन कुटुंब पुर्ण त्यांच्या वडिलांवर अवलंबू होते, परंतु त्यांच्या वडिलांना दारूचे व्यसन होते त्यामुळे संपूर्ण घर उध्वस्त झाले. खरं तर चार्ली यांचे कुटुंब खूप गरीब होते, त्यामुळे पैशाबाबत त्यांच्या घरात अनेकदा तणाव निर्माण व्हायचा.

चार्ली तीन वर्षांचे असताना त्यांचे पालक वेगळे झाले. गरिबी आणि दारिद्र्यात चार्लीला आपल्या भावासोबत अनाथाश्रमात राहावे लागले. त्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. असे म्हणतात की ते पैशासाठी दुसऱ्यांच्या घरात भांडी धुवायला जायचे.

वडिलांनंतर त्यांच्या आईने पुर्ण घराचा कार्यभार स्विकारला होता. चार्ली यांनी आपल्या चरित्र्यात लिहिले आहे की, माझी आई हॅना स्टेजवर गात होती आणि अचानक तिचा आवाज थांबला. प्रेक्षकांनी मोठ्याने आरडाओरडा केला, म्हणून शोच्या व्यवस्थापकाने ५ वर्षांच्या मुलाला स्टेजवर पाठवले.

तो दुसऱा कोण नसून मी होतो. काही वेळ मी शांत बसलो पण जेव्हा मी गायला सुरूवात केली तेव्हा माझा आवाज प्रेक्षकांना खुपच आवडला. चार्ली यांच्या घरी परिस्थिती चांगली नव्हती, परंतु त्यांनी कधी हार मानली नाही. त्यावेळी लंडनच्या रस्त्यावर ‘लँकशायर लँड्स’ नावाचा नृत्य समूह असायचा, ज्यात लहान मुले देखील होती.

चार्ली यांनी तिथे जाण्यास सुरवात केली. त्यांचा डान्स इतका चांगला नव्हता त्यामुळे त्याला जास्त पैसै मिळत नव्हते. चार्ली यांच्यासाठी हे दिवस खुप हालाखीचे होते. त्यांना राहण्यासाठी आणि खाण्यासाठी जागा हवी होती म्हणून पोट भरण्यासाठी त्यांनी पुष्पगुच्छ बनविण्यास सुरूवात केली. ते पुष्पगुच्छ ते एका बारच्या समोर विकायचे. सोबत ते वेटरचे कामसुद्धा करायचे जेणेकरून त्यांना जेवणही मिळत होते.

चार्लीला अभिनयाची आवड होती पण त्यांना वाचता येत नव्हते. त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचण्यात त्यांना अडचण येत होती. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना ‘ई हॅमिल्टन’ नाटकात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने संपूर्ण स्क्रिप्ट पाठ करून ठेवली होती.

चार्ली जेव्हा स्टेजवर आले तेव्हा त्यांना हेसुद्धा माहित नव्हते की त्यांचे हे पात्र इतके प्रसिद्ध होणार आहे. ‘शेरलॉक होम्स’मध्ये अभिनय करत चार्लीने सर्वांचे मन जिंकले. चार्ली यांनी अनेक चित्रपटात ट्रॅप नावाने अभिनय केला आहे जो त्यांचाच स्वताचा भुतकाळ होता.

चार्ली यांना मोशन पिक्चरकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि १९१३ मध्ये चार्ली हे पहिल्यांदा कॅमेऱ्यावर दिसले. चार्लीला आठवड्यातून १५० डॉलर्स मिळत असत, परंतु त्यांना यातुन खुप यश मिळाले आणि ते खुप प्रसिद्ध झाले. ते इतके प्रसिद्ध झाले होते की त्याच वर्षी त्यांनी १२ विनोदी चित्रपट साइन केले.

चार्ली यांना आयुष्यात अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले. चार्ली यांच्या निधनानंतर दोन दशकांनंतरही त्यांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. २५ डिसेंबर १९७७ रोजी ख्रिसमसच्या दिवशी जगाला हसवणाऱ्या या कलाकाराने जगाचा निरोप घेतला. जाताना मात्र चार्ली यांनी सगळ्यांना रडवले. त्यांचा जाण्याने अनेकांना दुख झाले. पण त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आजही ते अनेकांच्या मनावर राज्य करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.