बुधानी वेफर्स: पुण्याच्या एका बोळीत वेफर्स विकणारे भाऊ कसे झाले वर्ल्ड फेमस, वाचा संघर्षकथा

0

पुण्यातील सुप्रसिद्ध बुधानी बटाटा वेफर्सचे मालक राजूशेठ चमनशेठ बुधानी यांचे नुकतेच निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले होते. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्यानंतर पत्नी दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. बटाटा वेफर्सचे उद्योजक म्हणून ते खुप फेमस होते.

त्यांनी फक्त पुण्यातच नाही तर परदेशातही आपल्या वेफर्सचे नाव उंचावले आहे. पण बुधानी वेफर्सची सुरूवात कशी झाली याबद्दल खुप कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला त्याबाबत माहिती सांगणार आहोत. राजू बुधानी यांचे मोठे भाऊ बाबू बुधानी यांनी या व्यवसायाची सुरूवात केली होती.

त्यांचे वय सध्या ९० वर्षे आहे. ५५ वर्षांपुर्वी त्यांनी महात्मा गांधी रोडवरील पूना स्टोअर्स शेजारी एका लहान दुकानात त्यांना बटाट्याचे वेफर्स विकण्यास सुरूवात केली होती. हळूहळू पुर्ण महाराष्ट्रात त्यांनी वेफर्स विकण्यास सुरूवात केली. त्यांच्या गुणवत्तेमुळे आणि त्यांच्या वेफर्सच्या एका वेगळ्याच चवीमुळे ते पुर्ण महाराष्ट्रात फेमस झाले होते.

त्यांच्या याच कष्टामुळे आज त्यांची महात्मा गांधी रस्त्यावर तीन मजली इमारत आहे. नंतर त्यांनी अत्याधुनिक यंत्रे वापरून मोठ्या प्रमाणात बटाटा वेफर्ससोबत इतर पदार्थांची विक्री करण्यास सुरूवात केली. आज त्यांच्या बटाटा वेफर्सचे एक नाही दोन नाही तर १० प्रकार पुर्ण महाराष्ट्रात विकले जातात.

पुणेकरांसोबत पुर्ण महाराष्ट्राला बटाटा वेफर्सच्या एका वेगळ्या स्वादाची भुरळ घालणारे बुधानी वेफर्स पुर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. राजू बुधानी हे त्यांच्या मोठ्या चुलत्यांसोबत आणि दाजींसोबत पुण्यात आले होते. त्यांच्या दाजींनी पुणे दाखवण्यासाठी त्यांना पुण्यात आणलं होतं.

त्यांच्या वडिलांना वाटलं होतं फिरायला गेले आहेत चार दिवसात परत येतील. ते आले तेव्हा मे महिना चालू होता. त्यांच्या दाजींचे ड्रायफ्रुट्सचे दुकान पुण्यात होते. बॉम्बे ड्रायफ्रुट्स स्टोअर असे त्याचे नाव होते. दाजींनी बाबूंना विचारले की पुण्यात कसं वाटतंय त्यावर ते म्हणाले की मला पुणे खुप आवडलं.

त्यानतंर दाजींनी बाबूंना पुण्यातच राहण्यास सांगितले. याबाबत त्यांनी एका मुलाखतीत माहिती दिली होती. ते म्हणाले की, मी दाजींच्या दुकानावर बसायचे काम करायचो. तब्बल ८ वर्षे मी त्या दुकानात काम केले. १५ ऑगस्टला मी माझ्या व्यवसायाला सुरूवात केली.

महात्मा गांधी रोडवरील पूना स्टोअर्स शेजारी एक लहान दुकान टाकले आणि वेफर्स विकायला सुरूवात केली. दुकानाच्या लहान खिडकीतून ग्राहकांना मी माल विकायचो. जेव्हा मी सॅपल घेऊन बाजारात विकायला गेलो तेव्हा मिठाईवाले, हॉटेलवाले म्हणाले की आम्ही स्वता हे बनवतो.

मी त्यांना म्हणाले की कमीत कमी मला लेबर चार्ज तरी द्या. असं करता करता माझा व्यवसाय वाढला. मी विचार करायचो की ४ किलो वेफर्स विकले तर मी १२ आण्याची राईस प्लेट तरी खाऊ शकेल. पाहता पाहता १२ किलो वेफर्स मी रोज विकू लागलो. नंतर हळू हळू बिझनेस खुप वाढू लागला, अशी माहिती त्यांनी एका मुलाखतीत दिली होती.

आज बुधानी वेफर्सचे नाव खुप मोठे झाले आहे. बुधानी वेफर्स पुण्याची शान आहे असंही आपण म्हणू शकतो. आज प्रत्येक मोठ्या मॉलमध्ये किंवा किरानाच्या दुकानात तुम्हाला बुधानी वेफर्स पाहायला मिळतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.