जुन्या कार्स विकून ७० हजाराचे ३०० करोड केले, विराट कोहली, प्रिती झिंटासुद्धा आहेत ग्राहक

0

आज आम्ही तुम्हाला बीग बॉय टॉयचे फाउंडर जतिन आहुजा यांची प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत. त्यांनी आपल्या वडिलांकडून ७० हजार उधार घेऊन फिएट पालियो गाडी विकत घेतली आणि त्यातून त्यांनी जुन्या प्रिमीयम गाड्या विकण्याचा बिझनेस सुरू केला.

आज भारतीय संघांचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा तसेच बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया आणि प्रिती झिंटासुद्धा त्यांची ग्राहक आहे. फक्त ७० हजारात सुरू केलेला हा बिझनेस आज ३०० करोडवर पोहोचला आहे.

जेव्हा एप्रिलमध्ये कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन झाले होते तेव्हा कार्सची विक्री शुन्यावर आली होती. तरीही त्यांनी १३ करोड रुपये कमावले होते. बीबीटीचे शोरूम गुरूग्राम, मुंबई आणि हैदराबादमध्येसुद्धा आहेत.

जेव्हा त्यांनी बीबीटी कंपनी सुरू केली तेव्हा त्यांचे वय फक्त २३ वर्षे होते. त्यांची कल्पना होती की लक्झरी कार्स जास्तीत जास्त लोकांना अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि ते सेकंड हॅन्ड लक्झरी कार्स कमी किंमतीत विकण्याचे काम करतात.

ते जेव्हा ६ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या डोक्यात साध्या गांड्यांना लक्झरी गाड्या बनविण्याचा विचार आला होता. १७ वर्षांच्या वयात त्यांनी बिझनेस उभा करण्याचा विचार केला होता. त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण दिल्ली विश्वविद्यालय येथून घेतले.

त्यांनी आपल्या बिझनेस मॉडेलवर काम करायला सुरूवात केली. त्यांनी बीबीटीची सुरूवात ७० हजारापासून सुरू केली होती. त्यांनी त्यातून एक गाडी खरेदी केली आणि २००९ मध्ये दिल्लीमध्ये एक छोटासा स्टुडिओ तयार केला.

आता त्यांच्याकडे १५० लोकांची टीम आहे. त्या ठिकाणी जुन्या लक्झरी कार्स विकल्या जातात. २००५ मध्ये मुंबईच्या पुरामध्ये एक मर्सिडीज खराब झाली होती. त्या मर्सिडीजला त्यांनी नीट करून २५ लाखांना विकले होते.

त्यांनतर त्यांनी फॅन्सी मोबाईल नंबरवर लक्ष केंद्रित केले आणि १२०० फॅन्सी नंबर खरेदी केले. त्यातून त्यांनी २४ लाखांचा बिझनेस केला होता. त्यानंतर त्यांनी लक्झरी कार्सचा बिझनेस चालू ठेवला. २००७ मध्ये त्यांच्या कमाईचा आकडा २ करोडपर्यंत गेला होता.

त्यावेळी प्रिमियम कार्सचा बिझनेस करायला लोक घाबरत असत पण जतिन यांनी लक्झरी कार्सचा बिझनेस करून करोडो रूपये कमावले आहेत. आज त्यांच्या कार्स ६००० पेक्षा जास्त लोक वापरत आहेत. भारतातील के प्री-ओन्ड गाड्यांचे सगळ्यात मोठे डिलर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.