दोन खोल्यांमध्ये बहिण भाऊ बनवायचे चपला, आज आहे भारतातील सगळ्यात मोठी कंपनी

0

बाटा हा देशातला सगळ्यात मोठा चपला बनवणारा ब्रॅंड आहे. जरी ही एक एमएनसी कंपनी असली तरी तिचे हृद्य पुर्णपणे हिंदुस्तानी आहे. सुमारे ९० वर्षांपूर्वी या ब्रँडने देशात पदार्पण केले. ती अशी वेळ होती जेव्हा भारतात जपानमधून शूज येत असत.

तुम्हाला आठवत असेल की राज कपूर यांचे गाणे मेरा जूता है जपानी तेव्हाच आले होते. पण हळूहळू बाटा हा देशातील मध्यम वर्गाचा आवडता ब्रॅंड बनला. त्याने आपल्या कारकिर्दीची ४६ वर्षे पूर्ण केली आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाटाची एक रोचक कथा सांगत आहोत

बाटाचा प्रवास हा खुप विलक्षण होता. जून १९७३ मध्ये बाटामध्ये ज्याने ३० हजारांची गुंतवणूक केली होती ती आज एक करोड झाली आहे. जून १९७३ च्या १००० शेअर्समुळे आणि बोनसमुळे कंपनी २०१५ पर्यंत ७००० शेअर्समध्ये वाढली आहे.

कंपनीने 3 वेळा राईट्स इश्यू दिले आहेत. या शेअरने ४६ वर्षात ३३३ वेळा परतावा दिला आहे. जून १९७३ मध्ये लिस्टींग झाली होती. त्यांचा आयपीओ ३० शेअर्सच्या किंमतीवर आला होता. बाटा ही चेक रिपब्लीक देशाची कंपनी आहे.

याची सुरुवात १८९४ मध्ये थॉमस बाटा यांनी केली होती. कंपनी रबर आणि चामड्याच्या शोधात भारतात आली. कंपनीचा व्यवसाय कोलकाता येथून १९३९ मध्ये सुरू झाला. देशातील पहिले शू मशीन बाटानगरमध्ये बसविण्यात आले. आज भारत बाटाचा दुसरा सर्वात मोठा बाजार आहे.

बाटाकडे देशात १३७५ किरकोळ स्टोअर आहेत ज्यात ८५५ कर्मचारी काम करतात. यावर्षी कंपनीने ५ कोटी शूजची विक्री केली आहे. कंपनीचे ९० देशांमध्ये कामकाज आहे. यात एकूण ३० हजार कर्मचारी आणि ५ हजार स्टोअर आहेत. दररोज १० लाख ग्राहक कंपनीच्या दुकानात येतात.

पश्चिम बंगालच्या कोन्नानगरमध्ये बाटाने पहिला कारखाना सुरू केला होता, जो नंतर बटागंज येथे शिफ्ट झाला. बटागंज बिहारनंतर फरीदाबाद (हरियाणा), पिनया (कर्नाटक) आणि होसूर (तामिळनाडू) यासह पाच कारखाने सुरू झाले.

या सर्व ठिकाणी लेदर, रबर, कॅनव्हास आणि पीव्हीसीपासून स्वस्त, आरामदायक आणि बळकट शूज बनविले जायचे. बाटा हा आपल्या देशातील एक निष्ठावंत मध्यमवर्गीय ग्राहकाचा एक शू ब्रँड आहे.

युरोपियन देश झेकॉस्लोवाकियातील ज्लिन या छोट्याशा गावात राहणारे बाटा कुटुंब पिढ्यानपिढ्या बुट बनवायचे काम करत होते. वर्षे संघर्षांच्या दरम्यान गेली. जेव्हा मुलगा टॉमसने मोठी स्वप्ने पाहिली तेव्हा या कुटुंबाचे नशीब उलटले.

कौटुंबिक उद्योगांना व्यावसायिक बनविण्यासाठी त्याने आपली बहीण एन्ना आणि भाऊ अँटोनिन यांना पार्टनर बनवले. मोठ्या अडचणीने भावंडांनी आईला राजी केले आणि त्यांच्याकडून ३२० डॉलर्स घेतले.

यानंतर त्यांनी गावात दोन खोल्या भाड्याने घेतल्या आणि हप्त्यावर दोन शिवणकामाच्या मशिन घेतल्या, कर्ज घेऊन कच्चा माल विकत घेतला आणि व्यवसाय सुरू केला. काही दिवसांना टॉमसची साथ सगळ्या भावंडांनी सोडून दिली तरीही तो खचला नाही व्यवसाय चालूच ठेवला.

काही दिवसांनंतर खोल्या कमी पडू लागल्या. व्यवसाय वाढविण्यासाठी टॉमसला प्रचंड कर्ज घ्यावे लागले. वेळेवर कर्जाची परतफेड न केल्याने त्याला खुप अडचणी आल्या होत्या. त्यांच्यावर खुप दबाव होता.

टॉमस आणि त्याच्या तीन कर्मचार्‍यांनी सहा महिन्यांकरिता न्यू इंग्लंडच्या शू कंपनीत मजूर म्हणून काम केले. यावेळी त्यांनी बऱ्याच कंपन्यांचे कामकाज जवळून पाहिले आणि त्यांचे कामकाज समजून घेऊन ते घरी परतले.

येथे त्यांनी एका नव्या मार्गाने काम सुरू केले. १९१२ मध्ये, टॉमसने ६०० मजुरांना नोकरी दिली आणि शेकडो लोकांना त्यांच्या घरात काम दिले. त्यानंतर त्यांनी अनेक स्टोर्स खोलली आणि योग्य नियोजन केले.

महायुद्धानंतर बाटाने किंमत कमी करण्याच्या सूत्राने जबरदस्त प्रगती व विस्तार केला. बाटाच्या शुजचे उत्पादन सुमारे १५ पट वाढले आणि सुमारे २७ देशांमध्ये पसरले. भारतही त्यापैकी एक होता.

बाटा स्टोअरची किरकोळ रिटेल चेनही हिट ठरली आणि त्याच्या शेकडो फ्रेंचायझी उघडण्यास सुरूवात झाली. दरम्यान ५० वर्षे पुढे विचारात घेऊन, बाटांनी मोजे, चमड्याचे सामान, टायर, रबर या वस्तू बनवून कंपनीचे विस्तार शूज व्यतिरिक्त केले.

आता बाटा शु ही फक्त कंपनी राहिलेली नाही तर एक ग्रुप बनला आहे. लवकरच बाटा जगातील सर्वात मोठा शुज निर्यात करणारी कंपनी बनेल. टॉमस बाटा यांनी आपले मुख्यालय एका इमारतीत बांधले जे युरोपमधील सर्वात उंच कॉक्रिट इमारत मानली जाते.

१२ जुलै रोजी ५६ वर्षीय टॉमस बाटा यांचे हवाई अपघातात निधन झाले. त्यांच्या विमानाचा अपघात इमारतीच्या चिमनीला धडकल्यामुळे झाला होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.