वडिलांनी जमीन विकून व्यवसाय करण्यासाठी दिले २० हजार, मुलाने उभी केली २४०० कोटींची कंपनी

0

तुम्हाला आज आम्ही बालाची वेफर्सची यशोगाथा सांगणार आहोत. चंदुभाई हिराणी यांनी बालाजी वेफर्सची स्थापना केली होती. आज बालाची वेफर्स हल्दीरामसारख्या मोठ्या ब्रॅन्डला टक्कर देत आहे. पण फक्त ९ वी पास असलेल्या चंदुभाई हिराणी यांनी इतकी मोठी कंपनी कशी सुरू केली?

गुजरातमधील जामनगर हा दुष्काळग्रस्त भाग आहे. याच भागातील कालवड तालुक्यातील धुंधोराजी हे २००० लोकवस्ती असलेल्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला होता. या गावातील पोपटराव विराणी आपल्या कुटुंबासह शेतात काम करत होते.

त्याचवेळी १९७२ ला भयंकर दुष्काळ पडला होता. शेती करणे खुप अवघड झाले होते. पोपटभाईंनी आपली जमीन विकली आणि ती जमीन विकून जे २० हजार रुपये आले ते आपल्या मुलाला व्यवसाय करण्यासाठी दिले.

त्यांची मुले व्यवसाय करण्यासाठी राजकोटला आले. शेतीसंबधित काहीतरी व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्याप्रमाणे त्यांना खते आणि साधणे खरेदी केली. पण नंतर त्यांना ही साधने विकताना असे कळले की ही साधने नकली आहेत.

विराणी बंधुंना हे ऐकून धक्काच बसला. फसवणुकीमुळे त्यांचे खुप मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर त्यांना एक कॉलेज कॅन्टीन चालू करण्याचे ठरवले. त्यावेळी चंदुभाई १४ वर्षांचे होते. त्यावेळी ते कॅन्टीनध्ये काम करायचे.

पण ते कॅन्टीनसुद्धा बंद पडले. १९७४ मध्ये ते एका थिएटरमधल्या कॅन्टीनमध्ये कामाला लागले. कॅन्टीनमध्ये काम करताना ही मुले तिकीट खिडकीवर तिकीटेही विकायची. त्यांच्या या कष्टाळू स्वभावाने सिनेमाचे मालक गोविंदभाई खुष झाले.

१९७६ मध्ये त्यांनी विराणी बंधूंना कंत्रांटी पद्धतीने कॅन्टीन चालवण्यास दिले. सुरूवातीला त्यांना स्थानिक व्यापाऱ्यांकडून वेफर्स विकत घेतले आणि विकायला सुरूवात केली. मात्र त्यामध्ये जास्त फायदा होत नव्हता.

व्यवसायात मदत करण्यासाठी त्यांच्या बायकाही तिथे आल्या. त्या स्टोव्हवर सॅन्डविच तयार करायच्या. १९८२ मध्ये त्यांनी अक तवा विकत घेतला आणि वेफर्स तयार करण्यास सुरूवात केली. हा त्यांचा टर्निंग पॉइंट होता.

त्यांना त्यातून खुप फायदा होत असल्याचं दिसलं. मग त्यांनी हे वेफर्स दुकानांत देखील विकण्यास सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी या वेफर्सला बालाजी हे नाव दिले. पण काही दुकानदार त्यांना भिकाऱ्याची वागणुक देत असत.

मात्र त्यांनी यासगळ्याकडे लक्ष दिले नाही. नंतर त्यांच्याकडे २०० ग्राहक झाले. मागणी वाढल्यानंतर त्यांनी वेफर्स बनविण्याचे यंत्रे विकत घेतली. मात्र त्यांना अजूनही नफा कमी होत होता. १९८९ मध्ये त्यांनी बॅंकेतून ३.६० लाखांचे कर्ज घेतले आणि १००० चौ. मीटरची जागा विकत घेतली.

तीन वर्षांत त्याच्या व्यवसायाची उलाढाल ३ कोटी रूपये झाली होती. त्यानंतर त्यांनी तासाला १००० किलो वेफर्स तयार करणारे यंत्र खरेदी केले. मात्र हे यंत्र बंद पडले. पण त्यांनी हार मानली नाही. २००३ मध्ये त्यांनी १२०० किलो प्रतितास वेफर्स तयार करणारे यंत्र घेतले.

२००० ते २००६ साली गुजरातमध्ये ९० टक्के बाजारपेठ त्यांनी काबीज केली होती. नमकीनमध्येही तेच आघाडीवर होते. आज बालाजी वेफर्स दर दिवसाला साडेचार लाख किलो वेफर्स तयार करते आणि ४ लाख किलो नमकीन दिवसाला तयार करते. तर ही होती बालाजी वेफर्सची यशोगाथा.

Leave A Reply

Your email address will not be published.