वर्गिज कुरियन: श्वेत क्रांतीचा जनक आणि भारताला दुध उत्पादनात अग्रेसर बनवणारा व्यक्ती

0

भारताला दुधाचा मोठा उत्पादक देश बनविण्याचे काम ज्या माणसाने केले त्यांचे नाव होते व्हर्गिज कुरियन. लोक त्यांना मिल्कमॅन म्हणूनही ओळखतात. त्यांच्या सन्मानार्थ लोक त्यांना दुधाची नदी वाहणारा माणूस म्हणूनही संबोधतात. कुरियन यांना भारतात दुध उत्पादनात क्रांती केल्यामुळे लोक ओळखतात.

त्यांच्या एका आयडियाने आज अमुलसारखी भारतातील सगळ्यात मोठी दुध उत्पादक कंपनी सुरू झाली. आज तिचा व्यापार करोडोंच्या घरात आहे. केरळच्या कोझीकोड भागात २६ नोव्हेंबर १९२१ ला डॉक्टर व्हर्गिस कुरियन यांचा जन्म झाला होता. कुरियन लहानपणापासूनच अभ्यासात खुप हुशार होते.

त्यांचे वडील सिवील हॉस्पिटलमध्ये एक सर्जन होते. त्यांची अशी इच्छा होती की आपल्या मुलानेही डॉक्टर बनावे. पण कुरियन यांना इंजिनिअरींग करायची होती. सुरूवातीचे शिक्षण झाल्यानंतर ते डेअरी इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत मिशीगन विद्यापिठात गेले.

भारत सरकारच्या स्पॉन्सरशिपमध्ये ते न्युझीलंडमध्ये १९५२ मध्ये डेअरी टेक्नॉलॉजी समजण्यासाठी निघून गेले. जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांनी ठरवले होते की आपल्याला भारताला सगळ्यात मोठा दुध उत्पादक देश बनवायचे आहे. त्यांनी भारताला आत्मनिर्भर बनवायचे ठरवले आणि त्यांनी सुरूवात करण्यासाठी गुजरातच्या आनंद ला निवडले.

आनंद प्रदेशातून त्यांनी श्वेत क्रांतीला सुरूवात केली. त्यांनी लोकांना दुध उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहीत केलं. त्यांनी आनंद मध्येच एक समिती तयार केली ज्याला त्यांनी अमूल असे नाव दिले. तेथून सुरू झाला अमुलचा प्रवास. हळूहळू त्यांचे मिल्क प्रॉडक्टस पुर्ण गुजरातमध्ये प्रसिद्ध झाले.

डॉ. कुरियन यांनी दूधाला पुर्ण देशात पोहोचवण्यासाठी १९४६ साली अमुल ब्रॅंडची स्थापना केली आणि त्याला बाजारात उतरवले. त्यानंतर त्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी १९७३ मध्ये गुजरातमध्ये को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटींग फेडरेशनची स्थापना केली.

ते या फेडरेशनच्या अध्यक्षपदी ३४ वर्षे होते. अमूलच्या नावाने बाजारात त्यांनी दुध, दही आणि तुप बाजारात उतरवले. डॉक्टरांनी लोकांना दुधापासून होणारे फायदे समजावले. त्यानंतर २० लाखांपेक्षा जास्त शेतकरी त्यांच्या फेडरेशनमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अमूलला इतकी प्रसिद्धी मिळाली की घराघरात अमूलच दिसू लागले.

दुधाला राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पातळीवर नेल्यामुळे त्यांना मिल्कमॅन असे नाव पडले. तसेच लोक त्यांना दुधाची नदी वाहणारे असेही म्हणू लागले. त्यांनी केलेल्या श्वेत क्रांतीमुळे आणि त्यांनी भारताला दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पद्मश्री आणि पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले.

एवढच नाही तर त्यांना १९६५ मध्ये रैमन मॅगसायसाय या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना १९८९ मध्ये विश्व खाद्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेव्हा ते ९० वर्षांचे होते तेव्हा एका गंभीर आजाराने त्यांचे निधन झाले. पण आजही लोक त्यांची आठवण काढतात. अमूल या कंपनीच्या रूपात ते आजही आपल्यासोबत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.